ETV Bharat / state

औरंगाबादेत बंदी असूनही खासदार इम्तियाज जलील काढणार मोर्चा

30 मार्च ते 8 एप्रिलप्रयत्न टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवण्यात आल्याने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. फक्त उद्योजकांच्या लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Mar 28, 2021, 3:45 PM IST

औरंगाबाद - कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने 30 मार्च ते 8 एप्रिलप्रयत्न टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवण्यात आल्याने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. फक्त उद्योजकांच्या लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

खासदार इम्तियाज जलील माहिती देताना

आरोग्य यंत्रणेवर सध्या ताण पडत असून सरकारी दवाखान्यातील अनेक जागा रिक्त आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, यासाठी अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र, जागा भरण्यासाठी हालचाली झाल्या नाहीत. एकीकडे रुग्ण वाढत असताना फक्त कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून जागा भरत नाही आहात का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. रुग्णाच्या आरोग्याला काही झाले तर त्याला रुग्णालय जबाबदार असतील हे लक्षात घ्या, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बंदी असली तरी काढणार मोर्चा...

जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेली टाळेबंदी उद्योजकांना खुश करणारी आहे. उद्योगांच्या विरोधात नाही आहोत, मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही का? त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या मागणीसाठी आणि औद्योगिक वसाहतीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 31 मार्च रोजी मोर्चा काढणार असून हा मोर्चा वाजत गाजत कोविडचे सर्व नियम पाळून काढणार असून तुम्हाला बंदी घालायची असेल तर आधी बंगालमध्ये मोठी गर्दी करून सुरू असणाऱ्या मोदी आणि अमित शाह यांच्या सभा बंद करून दाखवा, असा इशारा जलील यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.