ETV Bharat / state

डॉक्टरांनी माणुसकी दाखवत बाधित रुग्णाला घडवले आईचे अंत्यदर्शन

author img

By

Published : Jun 30, 2020, 12:47 PM IST

कोरोनाच्या दहशतीमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात राहायला अनेकांना भीती वाटते. त्यात बाधितांचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या मृतदेहाजवळ जाणेही टाळले जाते. मात्र, औरंगाबादेत डॉ. रितेश संकलेचा यांनी एका बाधित रुग्णाला त्याच्या आईचे अंत्यदर्शन घडवण्यासाठी स्वतःच्या गाडीतून नेत माणुसकीचे दर्शन घडवले.

The doctor Sankalecha and infected patient
डॉक्टर संकलेचा आणि बाधित रुग्ण

औरंगाबाद - काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे भावाचा मृत्यू झाला आणि त्यापाठोपाठ दोन दिवसांनी आईलाही कोरोनाने हिरावून नेले. आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याची तगमग सुरू होती. मात्र, स्वतःही कोरोनाबाधित असल्याने एका अल्पवयीन मुलाला ते शक्य होत नव्हते. अशा मुलाच्या मदतीला डॉक्टर देव म्हणून धावले आणि त्याने आपल्या आईचे शेवटचे दर्शन घेतले. औरंगाबादमध्ये हृदयाला स्पर्श करणारी ही घटना घडली.

औरंगाबादेत डॉ. रितेश संकलेचा यांनी एका बाधित रुग्णाला त्यांच्या गाडीतून आईच्या अंत्यदर्शनासाठी नेले

कोरोनाच्या दहशतीमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात राहायला अनेकांना भीती वाटते. त्यात बाधितांचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या मृतदेहाजवळ जाणेही टाळले जाते. मात्र, औरंगाबादेत डॉ. रितेश संकलेचा यांनी एका बाधित रुग्णाला त्याच्या आईचे अंत्यदर्शन घडवण्यासाठी स्वतःच्या गाडीतून नेत माणुसकीचे दर्शन घडवले.

औरंगाबाद महानगरपालिके अंतर्गत घाटी रुग्णालयात कोरोनामुळे एक महिला मरण पावली. संबंधित महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी चौकशी केली. त्या महिलेचा एक मुलगा हा दोन दिवसांपूर्वीच कोरोनाने मरण पावला, तर त्यांचा दुसरा मुलगा एमआयटी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

आपल्या आईचाही मृत्यू झाल्याची बातमी एमआयटी रुग्णालयात असलेल्या मुलाला समजल्यानंतर त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याची तगमग सुरू झाली. याबाबत त्याने प्रशासनाला विनंतीही केली. मात्र, हा मुलगा पॉझिटिव्ह असल्याने त्याला घाटी रुग्णालयात नेण्यास अनेक अडचणी होत्या. त्याला आईचे अंतिम दर्शन कसे घडवावे? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. सकाळची वेळ असल्याने मनपाच्या सर्व रुग्णवाहिका इतर बाधित रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी व्यस्त होत्या. अशावेळी त्या रुग्णालयात काम करत असलेले डॉक्टर मुलाच्या मदतीला धावून आले.

डॉ. रितेश संकलेचा यांनी स्वतः या पॉझिटिव्ह मुलाला घाटी रुग्णालयात नेण्याची तयारी दाखवली. त्यांनी एमआयटीच्या नोडल ऑफिसर तलत काझी व मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या परवानगीने त्यांनी त्या मुलाला घाटी येथे नेण्याचे ठरवले. त्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेत दोघांनीही पीपीई किट परिधान केले. सॅनिटायझरचा वापर केला. गाडीत दोघे एकमेकांच्या विरूद्ध दिशेला बसून ते घाटी रुग्णालयात पोहोचले. तेथे त्या मुलाने आईचे अंतिम दर्शन घेतले.

त्यानंतर डॉक्टर पुन्हा त्या मुलाला घेऊन एमआयटी रुग्णालयात घेऊन आले. डॉ. रितेश संकलेचा यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एका मुलाला आपल्या आईचे अंत्यदर्शन घडले. अशीच माणुसकी प्रत्येकाने जपली तर रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपण कोरोनावर लवकर मात करू शकतो, असा विश्वास डॉ. रितेश संकलेचा यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.