औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी दुपारी दोन पर्यंत 90.4 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत 1114 मतदारांपैकी दुपारी दोन वाजेपर्यंत 1003 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.
शहरात दोन, तर उर्वरित तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी एक, अशा दहा मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वेळ देण्यात आला होता. औरंगाबाद शहर सिल्लोड यासह आणखी काही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित मतदार आहेत. या मतदारांनी साडेतीन वाजेनंतर ते मतदानाचा हक्क बजावला. बाधित मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली होती.
हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन