औरंगाबाद - जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी 16 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 1,301 झाली आहे. रुग्णांची वाढत असलेल्या संख्येला मागील तीन दिवसांमध्ये काही प्रमाणात ब्रेक लागल्याने दिलासा मानला जात आहे.
औरंगाबादमध्ये वाढलेल्या रुग्णांमध्ये सुभाषचंद्र बोस नगर - एन 11 हडको -(4), भवानी नगर-(2), रोशन गेट -(1), हुसेन कॉलनी -(1), बायजीपुरा -(1), इटखेडा, पैठण रोड -(1), अल्तमश कॉलनी -(1), जवाहर नगर, गारखेडा परिसर -(1), शाह बाजार - (1), मयूर नगर, एन-6, सिडको -(1), राम नगर, एन 2 - (1), गजानन मंदिर परिसर - (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात 632 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांची संख्या 50 झाली आहे. असे एकूण रुग्णांचा आकडा 1301 वर पोहचला आहे. रविवारी दिवसभरात जिल्हा सामान्य रुग्णालयातून हुसेन कॉलनी १०, सादात नगर पाच, संजय नगर तीन, सिल्क मिल कॉलनी दोन, सदानंद कॉलनी, राम नगर, पुंडलिक नगर, भीमनगर, संभाजी कॉलनी, चाऊस कॉलनी, न्याय नगरातील प्रत्येकी एक असे एकूण 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
घाटी रुग्णालयातून रविवारी सिल्क मिल कॉलनीतील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या घाटीमध्ये १० जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी सकाळी 8.10 वाजता न्याय नगर, एन-8 सिडकोतील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा आजार होता. तसेच 51 वर्षीय टाऊन हॉल येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीमध्ये आतापर्यंत 45 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात चार असे एकूण पाच कोरोनाबाधितांचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 50 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.