ETV Bharat / state

कन्नड तालुक्यात भर दिवसा दांम्पत्याला लुटले; स्थानिकांच्या मदतीने चोरटा जेरबंद

कन्नड तालुक्यातील पिशोर-नाचनवेल बाबरा रस्त्यावर दांम्पत्याला अडवून मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी पाठलाग करुन पोलिसांना माहिती दिली; आणि चोरटा जेरबंद झाला.

author img

By

Published : Dec 2, 2019, 11:05 AM IST

aurangabad crime news
कन्नड तालुक्यात भर दिवसा दांम्पत्याला लुटले; स्थानिकांच्या मदतीने चोरटा जेरबंद

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील पिशोर-नाचनवेल बाबरा रस्त्यावर दांम्पत्याला अडवून मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. शेख लतीफ रशीद (राहणार पिशोर) असे चोराचे माव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

चोरट्याला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

जगन साहेबराव ठोकळ (रा.माळेगाव ठोकळ) पत्नीसह दुचाकीवरुन जात असताना डोंगरगांव शिवारात एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आडवले. यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली; आणि पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पोबरा केला. या मारहाणीत जगन ठोकळ यांचा पाय फ्रॅक्चर झाला.

प्रसंगी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व त्यांनी चोरटयाचा पाठलाग केला. यादरम्यान संबंधित चोर तलावातील झुडूपात लपल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. डोंगरगावचे सरपंच गजानन म्हस्के यांनी पिशोर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. यानंतर उपनिरीक्षक एन.वाय.अंतरप, पोना बोराडे, देशमुख या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; व आरोपीला ताब्यात घेतले.

या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी जगन ठोकळ यांच्या जबाबानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सह पोलीस निरिक्षक जगदीश पवार यांनी दिली आहे.

Intro:
कन्नड़ तालुक्यातील पिशोर- नाचनवेल बाबरा रस्त्यावर मोटारसायकल स्वार दांपत्यास अडवून चाकुचा धाक दाखवून मारहाण करीत मंगळसूत्र चोरल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाज़ेच्या सुमारास उघडकिस आली. आरोपीस पोलिसांनी लोकांच्या मदतीने ताब्यात घेतले.
Body:याबाबत अधिक असे की, जगन साहेबराव ठोकळ रा. माळेगाव ठोकळ हे रविवारी आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरुन जात होते. डोंगरगांव शिवारात एका अनोळखी इसमाने त्यांना अडवले व चाकुचा धाक दाखवून ठोकळ यांना मारहाण केली. तसेच पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पोबरा केला. मारहाणीत जगन ठोकळ यांचा पाय फ्रैक्चर झाला आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व चोरटयाचा पाठलाग केला. सदरील चोर शेजारी असलेल्या तलावातील झुड़पात लपुन बसला व लोकांना चाकुचा धाक दाखवू लागला डोंगरगांवचे सरपंच गजानन म्हस्के यांनी पिशोर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली व जखमी जगन ठोकळ यांना तातडीने फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना घाटी रुग्णालयात येथे हलविले. उपनिरीक्षक एन.वाय.अंतरप, पोना बोराडे, देशमुख आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.Conclusion:नागरिकांच्या मदतीने सदरील इसमास बाहेर काढून ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता शेख लतीफ रशीद रा. पिशोर असे असल्याचे सांगितले. या आरोपीवर विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असून तो तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी जगन ठोकळ यांचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि जगदीश पवार यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.