ETV Bharat / state

मतदान जागृतीसाठी धावले औरंगाबादकर; जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम - मतदान जनजागृती रॅली

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात शनिवारी सायंकाळी क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

रॅलीसाठी येताना अधिकारी
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:40 AM IST

औरंगाबाद - नवमतदारांमध्ये जनजागृती आणि नागरिकांनी मतदान करावे यासाठी औरंगाबादमध्ये मतदान जनजागृती रॅलीचे (रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी) आयोजन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात शनिवारी सायंकाळी क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन

कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन मिस इंडिया युनिव्हर्सची उपविजेती नवेली देशमुखने केले. मी सुद़्धा पहिल्यांदाच मतदान करणार असून मला प्रचंड उत्सुकता आहे, असेही नवेलीने सांगितले.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांचे राज्यात विरोधकच शिल्लक नाही, हे वक्तव्य लोकशाहीचा अपमान'

जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही रॅलीत सहभागी नागरिकांना मार्गदर्शन केले. या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विभागाची युथ आयकॉन नवेली देशमुखने नवमतदारांना मतदान करण्याची शपथ दिली.
रॅलीमध्ये महापालिका आयुक्त निपुण विनायक, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. टी. आर. पाटील, स्वीपचे प्रमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेतला.

रॅलीमध्ये सहभागी नागरिकांना प्रशासनाच्यावतीने पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यलयाच्यावतीने विविध कला पथकांचे सादरीकरण करण्यात आले.

Intro:नवमतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे, यासाठी मतदान जनजागृती रॅली (रन अँड वॉक फॉर डेमोक्रसी) औरंगाबाद शहरात आज संध्याकाळी ७ वाजता क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत काढण्यात आली. Body:कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन युथ आयकॉन मिस इंडिया युनिव्हर्स उपविजेत्या नवेली देशमुख यांनी या प्रसंगी केले. मी सुद़्धा पहिल्यांदाच मतदान करणार असुन मला प्रचंड उत्सुकता आहे असेही तीने सांगितले. Conclusion:यावेळी मिस इंडिया युनिव्हर्स उपविजेत्या नवेली देशमुख, जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही रॅलीत सहभागी नागरिकांना मार्गदर्शन केले. या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विभागाची युथ आयकॉन नवेली देशमुख यांनी नवमतदारांना मतदान करण्याची शपथ दिली.
रॅलीस जिल्हाधिकारी उदय चौधरी व मान्यवरांनी झेंडा
दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणात औरंगाबादकरांनी सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये महापालिका आयुक्त निपुण विनायक, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. टी. आर. पाटील, स्वीपचे प्रमुख तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले आदींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला. रॅलीमध्ये सहभागी नागरिकांना प्रशासनाच्या वतीने पदके वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यलयाच्यावतीने विविध कला पथकांचे सादरीकरण करण्यात आले. एमजीएम संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्यराष्ट्रीय सेवा योजनेच्या २७५ विद्यार्थ्यांसोबत एक हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. मिस इंडिया युनिव्हर्स उपविजेत्या नवेली देशमुख हिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.