औरंगाबाद - गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीने रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ऑक्सिजन चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल -
उपजिल्हा रुग्णालय गंगापूर डीसीएचसी सेंटरमधून 1 जून रोजी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जम्बो ऑक्सिजन सिलेंडरमधून एका व्यक्तीने ऑक्सिजन पाईपद्वारे दोन छोटे सिलेंडर कोणालाही न विचारता भरून घेतले. ही घटना एका व्यक्तीने मोबाईच्या कॅमेरात कैद केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधीक्षक डॉ. रमेश पवार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आधीच ऑक्सिजनचा तुटवडा अशाप्रकारे त्यात अशाप्रकारे ऑक्सिजन कुणालाही न विचारता भरून घेतल्याने ऐन वेळी ऑक्सिजन कमी पडून रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण व्हायची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - अभिनेत्री जुही चावलाची 5जी विरोधातील याचिका फेटाळली; ठोठावला 20 लाखांचा दंड