ETV Bharat / state

औरंगाबाद : वाळूज परिसरात चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यापुर्वी चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केली. चोरट्यांकडून एटीएमचा पत्रा कापल्या न गेल्याने एटीएममधील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

वाळुज पोलीस
वाळुज पोलीस
author img

By

Published : May 9, 2021, 10:15 PM IST

औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी परिसरातील सिडको महानगर-१ येथे असलेल्या अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांकडून एटीएमचा पत्रा कापल्या न गेल्याने एटीएममधील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या सिडको महानगर-१ येथे अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यापुर्वी चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केली. चोरट्यांकडून एटीएमचा पत्रा कापल्या न गेल्याने एटीएममधील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. हा प्रकार उघडकीस आल्यावर एमआयडीसी वाळूज पोलीसांनी धाव घेत पाहणी केली. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा -नाशिकमध्ये गोडाऊन फोडून लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.