औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मगणीसाठी एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील सावंगी बायपासवर ही घटना घडली. मंगेश संजय साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) असे तरुणाचे नाव आहे. आज मंगळवारी त्याने डिझेल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा युवक संताप व्यक्त करत आहे. न्यायालयात आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
तरुणाने यापूर्वीही आंदोलन केले आहे
औरंगाबादमध्ये मराठा समाजाच्या एका युवकाने डिझेल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी आपण स्वत:ला संपवत असल्याचे तो ओरडत होता. पण, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलीस आणि तरुणात झटापटही झाली. आत्महत्येचा प्रयत्न करणारा मंगेश साळवे हा प्रहार संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची आंदोलने करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - रोहित्र जळाल्याने महिनाभरापासून पाणीटंचाईसह पिकांची होरपळ