ETV Bharat / state

दहावीच्या मुलीसाठी विधानसभा अध्यक्षांचा बोर्डात ठिय्या - औरंगाबाद

एसएससी बोर्डाच्या गलथान कारभारामुळे एका मुलीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समजताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोर्डाचे कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

10 वीतील मुलीच्या निकालासाठी विधानसभा अध्यक्षांचा बोर्डात ठिय्या
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:36 AM IST

Updated : Jul 6, 2019, 8:47 AM IST

औरंगाबाद - एसएससी बोर्डाच्या गलथान कारभारामुळे एका मुलीचे शैक्षणिक नुकसान होत, असल्याचे समजताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोर्डाचे कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच ते यावेळी बोर्डात 2 तास ठिय्या मांडून होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारे बोर्डाचे नवे नियम तात्काळ बदला, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दहावीच्या मुलीसाठी विधानसभा अध्यक्षांचा बोर्डात ठिय्या

औरंगाबाद तालुक्‍यातील साजंखेडा येथील अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थीनीचा पेपरमधील काही पाने फाडल्यामुळे निकाल राखीव ठेवला होता. तसेच पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने पाने फाडल्याचा दावा बोर्डांतील अधिकाऱ्यांनी केला होता. यामुळेच अंजलीचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. याप्रकरणी अंजलीने बोर्डात तक्रार करून पाने आपण फाडली नसल्याचे लेखी स्पष्टीकरणही दिले होते. तरीही तिचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.

याविषियी 29 जूनला सुनावणी झाली. यावेळीही अंजलीने उत्तरपत्रिकेतील पाने फाडले नसल्याचा दावा केला होता. त्यानंतरही बोर्डाने तिचा निकाल राखीव ठेवल्यामूळे अंजलीने वडिलांसह विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यानंतर बागडे यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांना बोलतो, असे अंजलीच्या वडिलांना सांगितले.

त्यानंतर बागडे यांनी 4 वाजण्याच्या सुमारास थेठ एसएससी बोर्ड गाठले. शिक्षण सचिव सुगाता पुन्ने आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, उत्तर पत्रिकेचे पान फाडले असल्यामुळे आणि विद्यार्थिनीने कबुली दिल्यामूळे निकाल राखीव ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा बागडे यांनी उत्तरपत्रिका दाखविण्याची मागणी केली. मात्र, नियमानुसार उत्तरपत्रिका देता येत नसल्याचे कारण दिल्यानंतर जोपर्यंत उत्तरपत्रिका मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका बागडे यांनी घेतली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Intro:दहावीच्या परीक्षेतील हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पान फाडल्याचा आरोप करीत एसएससी बोर्डाने औरंगाबाद तालुक्‍यातील अंजली गवळी या विद्यार्थींनीचा निकाल राखिव ठेवला होता. निकाल लागल्यापासून अंजली वडीलासह बोर्डात चकरा मारत होती. शुक्रवारी अंजलीने विधानसभा अध्यक्षांना भेटून आपली कैफियत मांडली.Body:एसएससी बोर्डाच्या गलथानपणामुळे मुलीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कळताच बागडे यांनी बोर्डाचे कार्यालय गाठत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारे बोर्डाचे नवे नियम तात्काळ बदला,अशी मागणी देखील आपण मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. Conclusion:औरंगाबाद तालुक्‍यातील साजंखेडा येथील अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थीने मार्च मध्ये दहावीचा पेपर दिला होता. परंतु बोर्डाने तीचा निकाला राखिव ठेवला होता. निकाल राखिव ठेवल्यामूळे अंजलीने बोर्डात चौकशी केली असता, हिंदी पेपरातील काही पाने फाडलेली होती. ते पाने पेपर देणाऱ्या विद्यार्थीनीने फाडल्याचा दावा बोर्डांतील अधिकाऱ्यांनी केलो होता. यामूळेच अंजलीचा निकाला राखिव ठेवला होता. या विषयी अंजलीने बोर्डात तक्रार केली. पाने आपण फाडले नसल्याचे लेखी दिले होते. मी उत्तरपत्रिकेचे पाने कसे फाडणार असेही अधिकाऱ्यांना सांगितले. तरेही तिचा निकाल राखिव ठेवण्यात आला होता. त्या विषयी 29 जूनला सुनावणी झाली. यावेळीही अंजलीने उत्तरपत्रिकेतील पाने फाडले नसल्याचा दावा केला होता.त्यानंतरही बोर्डाने तिचा निकाला राखिव ठेवल्यामूळे अंजलीने वडिलांसह विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मी बोर्डातील अधिकाऱ्यांना बोलता असे अंजलीच्या वडीलांना सांगितले. दुपारी बागडे यांनी अंजलीच्या वडीलांना फोन करून काम झाले का विचारले. तेव्हा साहेब इंथ कोणीच दाद देत नाही. असे सांगिल्यानंतर चार वाजेच्या सुमारास हरिभाऊ बागडे थेट एसएससी बोर्डात गेले. शिक्षण सचिव सुगाता पुन्ने आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता,उत्तर पत्रिकेचे पान फाडले असल्यामूळे आणि विद्यार्थींने कबुली दिल्यामूळे निकाल राखिव ठेवल्याचे पुन्ने सांगितले. तेव्हा बागडे यांनी उत्तरपत्रिका दाखविण्याची मागणी केली.नियमानुसार उत्तरपत्रिका देता येत नसल्याचे कारण दिल्यानंतर जोपर्यंत उत्तरपत्रिका मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका बागडे यांनी घेतल्यामूळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. तीस तास हा गोंधळ बोर्डात सुरु होता.
Last Updated : Jul 6, 2019, 8:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.