औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणून घेतात. ते चौकीदार आहेत तर चौकीदारासमोरच देशावर एवढ्या गंभीर स्वरुपाचे हल्ले कसे काय होतात? असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.औरंगाबादेत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे आमदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी असदुद्दिन ओवेसी औरंगाबाद आले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली.
ओवैसी आपल्या भाषणात म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासून भीती दाखवून आपली मते घेण्यात आली. मात्र, आता आपली ताकद ओळखा आणि मतदान करा. इम्तियाज जलील यांचे यश म्हणजे सर्वांचेच यश आहे. महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील यांसारख्यांना निवडून पाठवलं. तर आम्ही मोदी सरकार पुन्हा येऊ देणार नाही. भाजप- सेना हे सर्व आता आपल्याला घाबरवत आहेत. आता आपण किती घाबरणार? आता घाबरायची गरज नाही. भारताचे संविधान आहे. देश स्वतंत्र झाला आहे देश आपला आहे. असेही ओवेसी म्हणाले. तसेच, जिंकून आलो तर नुसते मुस्लिमांसाठी नाही तर त्या-त्या भागातल्या समस्यांवर बोलू. सर्वांना सोबत घेऊन जाऊ. असा विश्वासही प्रसंगी असदउद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात दिला. भाजपवाले फक्त विकासाचे नाव घेतात. मात्र, विकास आहे कुठे? स्वतःला चौकीदार म्हणतात, मात्र चौकीदारी करत असताना देशावर हल्ले झाले कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यापुढे पुन्हा मोदी सरकार निवडून आले नाही पाहिजे. आम्ही जर निवडून गेलो. तर मित्रोला खुर्चीवर बसू देणार नाही. गेल्या पाच वर्षात दलित आणि गरीबांवर अन्याय झाले. त्याच्यावर कोणी बोलत नाही,असेही ओवेसी म्हणाले.
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे आता परेशान झाले आहेत. एमआयएम निवडणूक लढवणार हे कळल्यावर ते खूश झाले होते. मात्र, वातावरण बघून त्यांना भीती वाटायला लागली आहे. कारण आता आम्ही जागे झालो आहोत. त्यामुळे जातीयवादी पक्षांना दूर ठेवून विकासासाठी मत द्या. असे आवाहनही प्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवैसी यांनी मतदारांना केले.औरंगाबादेत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे आमदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी असदुद्दिन ओवेसी औरंगाबाद आले आहेत. चार दिवस ओवैसी शहरातच तळ ठोकणार आहेत. ते विविध ठिकाणी रोड-शो आणि कॉर्नर मिटिंग्स घेऊन आपल्या पक्षाची विचारधारा मतदारांपर्यंत पोहोवचणार आहेत.