औरंगाबाद - गंगापूर शहरातील समतानगर येथील गंठण काम करणाऱ्या कारागिराने बारवामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाऊसाहेब बाळासाहेब जंगम (वय, ५०) असे या मृत कारागिराचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी घरातून गेले होते निघून
गेल्या दोन दिवसांपूर्वी भाऊसाहेब जंगम घरात कोणाला काहीही न सांगता संध्याकाळी निघून गेले होते. कुंटुंबियांनी त्याचा शोघही घेतला. गंगापूर - कायगाव मार्गावरील अहिल्याबाई बारवामध्ये त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना काही नागरिकांना आढळला. याबद्दल गंगापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढता आला नाही. शनिवारी सकाळी बारवामधून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह प्रकाश शांताराम माळी, राहुल दिलीप थोरात, पोलीस पाटील संदीप रामभाऊ चित्ते यांनी मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेला.
आर्थिक अडचणीमुळे होते नैराश्यात
सराफा दुकानासमोर बसून गंठण काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भाऊसाहेबचे लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षांपासून काम बंद होते. त्यामुळे घरात पैशांची चणचण जाणवत होती. थोड्याफार उत्पन्नातून घर चालवायचे. मात्र मुलीच्या लग्नाची चिंता आणि आर्थिक चणचण होत असल्याने ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा - प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच खरे सूत्रधार, NIA ला आधीपासून होता संशय