औरंगाबाद - दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोन चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाऊन हॉलजवळ मुसक्या आवळल्या आहेत. राजेंद्र विष्णु आधुडे (वय 32 वर्षे, रा. नवनाथनगर, भारतनगर) व शेख राजेक शेख सुलतान (वय 20 वर्षे, रा. हुसेन कॉलनी) यांना पकडले. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल हे आपल्या पथकासह गणेशोत्सव बंदोबस्तावर होते. यावेळी दोघे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी टाऊन हॉल परिसरात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरुन पथकाने शेख राजेक व राजेंद्र आधुडे यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून पुंडलिकनगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी (एम एच 20 एफ क्यू 0403) आणि खुलताबादेतून चोरलेली दुचाकी (एम एच 20 एक्यू 4157) जप्त करण्यात आली. या दोघांना सध्या पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याबाबतचा पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत. ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत, संजय जाधव, संदीप क्षीरसागर, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - पोलिसांनी आवळल्या चंदनचोरांच्या मुसक्या; ९८ किलो चंदन जप्त