ETV Bharat / state

Death Of Student : बाकावर बसण्याचा वाद, वर्ग मित्राच्या मारहाणीत सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Death Of Student

शाळेत बाकावर बसण्यावरुन शाळकरी मुलांमधे वाद झाला. यानंतर वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Death Of Student )

Childs death due to beating by classmates
वर्गमित्रांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 20, 2023, 12:42 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : अल्पवयीन मुलांमधेही गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात गंभीर गुन्हे होत असल्याचे अनेक घटनांमध्ये उघड झाले आहे. अशीच एक घटना दौलताबाद परिसरात उघडकीस आली आहे. शाळेत बाकावर बसण्यावरून वर्गमित्रांमधे वाद विकोपास गेला. यात मित्रांनी केलेल्या मारहाणीत अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कार्तिक मनोहर गायकवाड असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना : दौलताबादच्या देवगिरी महाविद्यालयात कार्तिक मनोहर गायकवाड हा अकरा वर्षाचा विद्यार्थी सातवी वर्गात शिकत होता. तो आणि त्याची मोठी बहीण दोघेही सोबतच शाळेत जायचे. 6 जुलै रोजी त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका मित्रासोबत बाकावर बसण्यावरून वाद झाला. त्यानंतर कार्तिक आणि त्याचे मित्र खेळत असताना भांडण झालेला वर्गमित्र आपल्या काही मित्रांसह आला आणि त्याने कार्तिकला बेदम मारहाण केली. कार्तिक घरी आल्यावर पोटात दुखत असल्याचे सांगितले आणि त्याने शाळेत जाने बंद केले. मात्र 11 जुलै रोजी त्याचा त्रास अधिक वाढला त्यामुळे वडिलांनी त्याला अब्दीमंडी येथे एका दवाखान्यात दाखवले, मात्र त्याचे दुखणे वाढत असल्याने त्याला कन्नड मध्ये एका खाजगी दाखवणार उपचारासाठी नेले. मात्र तिथेही उपयोग झाला नाही. शेवटी घाटी रुग्णालयात त्याला दाखल केले असताना 14 जुलै रोजी त्याचे निधन झाले.

वडिलांनी दिली तक्रार : शाळेत भांडण झाल्याने कार्तिक गायकवाड याचा मृत्यू झाला. आणि त्याच्या आई-वडिलांना त्यांचा एकुलता एक मुलगा गमवावा लागला. त्याला एक मोठी बहीण आहे, या घटनेनंतर कार्तिकचे वडील मनोहर गायकवाड यांनी बुधवारी पोलिसात तक्रार दिली. यामध्ये त्यांनी वर्गमित्राने मारहाण केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली. त्यावरून दौलताबाद पोलिसात अल्पवयीन शाळकरी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली आहे.

मुलांमधे आक्रमक पणा वाढला : गेल्या काही वर्षात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुणांचे प्रमाणात वाढत आहे. या कृतींना सध्या समाज माध्यम, टीव्ही हे सर्वाधिक कारणीभूत असल्याचे मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले. सध्या सर्वच घरांमध्ये टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे इतकेच नाही तर कोरोनाच्या काळात मुलांना मोबाईल हाताळण्याची सवय अधिक झाली आहे. त्यात सोशल मीडियावर लहान मुले सर्रास वावरतात. त्यामध्यामातून चुकीच्या गोष्टी त्यांना अधिक प्रमाणात कळत असून छोट्या गोष्टीवर ते आक्रमक होतात आणि अशा घटना घडत आहेत त्यामुळे मुलांची मैत्री पुस्तकासोबत हवी मोबाईल सोबत नको असा सल्ला माणसोपचार तज्ञ डॉ मोनाली देशपांडे यांनी दिला आहे

हेही वाचा :

  1. Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ: पोलिसांच्या उपाययोजना फेल?
  2. Misuse Right To Information Act : माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर, एकाच माहितीसाठी एकाने केले 23 अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.