ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चांगली कामगिरी करेल - अंजली आंबेडकर - अंजली आंबेडकर

विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष बांधणीला चांगला वेळ मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी होईल, असा विश्वास अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला.

अंजली आंबेडकर
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:07 PM IST

औरंगाबाद - विधानसभेत वंचित बहुजन आघाडी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे व्यक्त केला. लोकसभेत आमचा पक्ष नवीन होता. मात्र, आता विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगला वेळ मिळाला असल्याने पक्षाची कामगिरी निश्चितच चांगली होईल.

अंजली आंबेडकर यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर या स्वतः प्रत्येक शहरात जाऊन महिलांच्या मुलाखती घेत आहेत. राज्यात वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांनी मोलाचा वाटा उचलला त्यामुळेच पक्षाला हे यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पक्ष हा नवीन होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाला चांगली कामगिरी करूनही दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले. मात्र, विधानसभा निवडणुकीत आता पक्ष बांधणीला चांगला वेळ मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी होईल, असा विश्वास अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला.

पक्षांमध्ये अनेक उच्चशिक्षित महिला आता येण्यास इच्छूक आहेत. अनेकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली आहे. मात्र, नुसता शिक्षण हा आमचा पार्श्वभूमी नसून सामाजिक कार्य, समाजाशी असलेली तळमळ या सर्व गोष्टी आम्ही तपासून पाहत आहोत. महिलांना सक्षम करण्यासाठी पक्ष आता पुढे सरसावला असून पक्ष महिलांच्या विविध अडचणी सोडणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत-जास्त संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मत अंजली आंबेडकर यांनी औरंगाबादेत व्यक्त केले.

Intro:विधानसभेत वंचित बहुजन आघाडी चांगली कामगिरी करेल असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद व्यक्त केला. लोकसभेत आमचा पक्ष नवीन होता मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगला वेळ मिळाला असल्याने पक्षाची कामगिरी निश्चितच चांगली असं अंजली आंबेडकर यांनी औरंगाबाद सांगितलं.

Body:वंचित बहुजन महिला आघाडीच्या विविध पदांसाठी महिलांच्या मुलाखती घेण्यासाठी अंजली आंबेडकर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत औरंगाबादेत आल्या होत्या. लोकसभेत वंचित बहुजन आघाडी ला मिळालेली अशात महिलांचा मोठा वाटा असल्याचे मत अंजली आंबेडकर यांनी औरंगाबादेत व्यक्त केलं.

Conclusion:लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर या स्वतः प्रत्येक शहरात जाऊन महिलांच्या मुलाखती घेत आहेत. राज्यात वंचित आघाडी ला चांगला प्रतिसाद मिळत असून लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांनी मोलाचा वाटा उचलला त्यामुळेच पक्षाला हे यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पक्ष हा नवीन होता त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाला चांगली कामगिरी करूनही दुसऱ्या नंबर वर समाधान मानाव लागलं मात्र विधानसभा निवडणुकीत आता पक्ष बांधणीला चांगला वेळ मिळाला असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी हे निश्चित चांगले असेल असं विश्वास अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला. पक्षांमध्ये अनेक उच्चशिक्षित महिला आता येऊ इच्छित असून अनेकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली आहे. मात्र नुसता शिक्षण हा आमचा पर्शवभूमी नसून, सामाजिक कार्य समाजाशी असलेली तळमळ या सर्व गोष्टी आम्ही तपासून पाहत आहोत. महिलांना सक्षम करण्यासाठी पक्ष आता पुढे सरसावला असून पक्षांच्या महिलांच्या विविध अडचणी पक्ष सोडणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मत देखील अंजली आंबेडकर यांनी औरंगाबादेत व्यक्त केलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.