ETV Bharat / state

अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकांचे हाल; पर्यटक संख्या घटण्याची भीती

author img

By

Published : Sep 3, 2019, 11:16 PM IST

जगप्रसिद्ध अंजिठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन दुतावासातील पर्यटकांचे हाल झाल्याची माहिती आहे.

अमेरिकन पर्यटक

औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला आलेल्या अमेरिकन दुतावासातील पर्यटकांना वेळेवर बस मिळाली नाही. यामुळे त्यांना चक्क दिडतास उभे रहावे लागल्याची माहिती आहे.

जसवंत सिंग यांची प्रतिक्रिया

औरंगाबादची अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध वारसा मानला जातो. ही लेणी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक अजिंठ्यात येत असतात. मात्र, पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा कमी असल्याने अनेकवेळा पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमेरिकन दूतावासातील 35 ते 40 पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना वातानुकूलित बस नसल्याने दीड तास ताटकळत उभे राहावे लागल्याची माहिती आहे. लेणी परिसरात पाच किलोमीटर अंतर चालत जाण्यासाठी बस स्थानकापासून वातानुकूलित आणि पर्यावरण पूरक पाच बसेस कार्यान्वित आहे. मात्र, त्यापैकी तीन बस नादुरुस्त असल्याने दोनच बसवर काम भागावले जात आहे. याचाच फटका अनेक पर्यटकांना बसत असल्याने लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, याचा परिणाम पर्यटक संख्येवर होण्याची भीती व्यक्त जात आहे.

Intro:जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला आलेल्या अमेरिकन दूतावासांना वेळेवर बस नसल्याने चक्क दिडतास उभं रहावं लागल्याचं निदर्शनास आल आहे.Body:रविवारी जवळपास 35 ते 40 विदेशी पर्यटक आणि दूतावास अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेले होते. रविवार असल्याने लेण परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात होती, त्यात वातानुकूलित पर्यावरण पूरक पाच पैकी दोन बस या कार्यरत होत्या. त्यामुळे दोन बसवर सर्व मदार आलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अमेरिकन दूतावासांना सर्वसामान्य पर्यटकांच्या रांगेत उभं राहून लेनिकडे जावव लागले. Conclusion:औरंगाबादची अजिंठा लेणी जगप्रसिद्ध वारसा मानला जातो. या लेणी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने अजिंठ्यात दाखल होतात. मात्र पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा कमी असल्याने अनेकवेळा पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. अमेरिकन दूतावास लेणी पाहण्यासाठी गेले असता, बस नसल्याने त्यांना दीड तास ताटकळत उभं राहावं लागल्याचं पाहायला मिळालं. लेणी परिसरात पाच किलोमीटर जाण्यासाठी बस स्थानकापासून वातानुकूलित आणि पर्यावरण पूरक पाच बसची कार्यान्वित आहे. मात्र त्यापैकी तीन बस खराब असल्याने दोन बसवरच काम भागावण्याचा प्रकार सुरू आहे. त्याचाच फटका अनेक पर्यटकांना बसत असल्याने लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याचा परिणाम पर्यटक संख्येवर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जसवंत सिंग - अध्यक्ष टुरिस्ट व्यावसायिक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.