ETV Bharat / state

राज्यात जिम सुरू करण्याचे आदेश, औरंगाबादेत मात्र अद्याप जिम बंदच - Fitness Centre in Aurangabad

दसऱ्यानंतर जिम सुरू होतील, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. औरंगाबादमधील जिम चालकांनी आपले साहित्य सॅनिटायजेशन आणि इतर तयारी केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर काही प्रमाणात जिम सुरू झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये जिम सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शहरी भागात असलेल्या जवळपास 250 ते 300 जिमपैकी काही जिम चालक मनपाच्या आदेशाची आणि नियमावलीची वाट पाहत आहेत.

amc and police Commissioner do not order to Gym open in Aurangabad
राज्यात जिम सुरू करण्याचे आदेश, औरंगाबादेत मात्र अद्याप जिम बंदच
author img

By

Published : Oct 26, 2020, 9:52 AM IST

औरंगाबाद - राज्यभरात आजपासून जिम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र औरंगाबादमधे अद्याप जिम सुरू झालेल्या नाहीत. महानगर पालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्याकडून अद्याप सूचना नसल्याने जिम सुरू झाल्या नाहीत, असे जिम चालकांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

दसऱ्यानंतर जिम सुरू होतील, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. दिलेल्या नियमानुसार जिम चालकांनी आपले साहित्य सॅनिटायजेशन आणि इतर तयारी केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर काही प्रमाणात जिम सुरू झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये जिम सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शहरी भागात असलेल्या जवळपास 250 ते 300 जिमपैकी काही जिम चालक मनपाच्या आदेशाची आणि नियमावलीची वाट पाहत आहेत.

जिम चालक सॅम खान यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे...

जिमसह साहित्याचे सॅनिटायजेशन -
मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिम बंद ठेवण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिले होते. एक महिन्याआधी केंद्र सरकारने जिम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी राज्यातील परिस्थिती पाहता जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दसऱ्यापासून जिम सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर जिम चालकांनी आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जिमची स्वच्छता आणि सॅनिटायजेशन करून घेतले.

राज्य सरकारच्या सूचनाच मिळाल्या नाहीत -

जिमच्या जुन्या सदस्यांनी जिम कधी सुरू करणार, याची विचारणा सुरू केली. इतकेच नाही तर कोरोना होऊ नये म्हणून अनेक युवकांनी जिम सुरू करण्यासाठी विचारणा केल्याची माहिती औरंगाबादच्या रिलायबल जिमचे चालक सॅम खान यांनी दिली. राज्य सरकारच्या सूचना जरी मिळाल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर अद्याप सूचना मिळाल्या नाहीत. महानगर पालिका आणि पोलीस विभागाकडून आदेश किंवा नियमावली मिळाली नसल्याने अद्याप जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाची नियमावली आणि सूचना मिळताच जिम सुरू होतील, तशी तयारी केल्याचे औरंगाबादच्या आविष्कार कॉलनी येथील जिम चालक सॅम खान यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.