ETV Bharat / state

Ambadas Danve Reaction On Kirit Somaiya Notice: व्हायरल व्हिडिओ क्लिपचे प्रकरण वाढणार? किरीट सोमैय्यांची अंबादास दानवेंना 18 पानांची नोटीस - अंबादास दानवे यांना नोटीस

भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना नोटीस पाठवली आहे. यावर अंबादास दानवे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Ambadas Danve Reaction on Kirit Somaiya
अंबादास दानवे
author img

By

Published : Aug 20, 2023, 9:19 AM IST

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : दोन दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी अचानक शहरात हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना नोटीस बजावली आहे. अंबादास दानवे यांना शनिवारी दुपारनंतर स्पीड पोस्टाने 18 पानांची नोटीस मिळाली आहे. मात्र, ही नोटीस कशाबद्दल आहे, हे अद्याप पाहिलं नाही. आपण अशा नोटीसला घाबरत नाही. त्यांना कायदेशीर सडेतोड उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलीयं.

किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ : काही दिवसांपूर्वी किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. विधान परिषदेच्या सभागृहात अंबादास दानवे यांनी या व्हिडिओची सत्यता पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसंच त्यासंबंधीचा एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्याप्रकरणी ही नोटीस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमैय्या दानवेंची विमानतळावर भेट : भाजपा नेते किरीट सोमैय्या 16 ऑगस्टच्या संध्याकाळी शहरात दाखल झाले होते. मोठा पोलीस, फौजफाटा घेऊन त्यांनी शहरात काही ठिकाणी भेटी देखील दिल्या होत्या. त्यावेळी विमानातून येत असताना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विमानतळावर त्यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळेस त्यांनी तुम्हाला लवकरच एक नोटीस पाठवणार असल्याचं सूचक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यावर ही नोटीस प्राप्त झाल्यावर आता विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नेमकं काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कथित व्हिडिओ व्हायरल : काही दिवसांपूर्वी किरीट सोमैय्या यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून विधान परिषदेत बोलताना अंबादास दानवे यांनी सोमैय्यांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमैय्या यांनी महिलांना ब्लॅकमेल केलं, त्यांचं शोषण केलं. त्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला. या सगळ्या प्रकाराचे 8 तासाच्या क्लिप माझ्याकडे आहेत, असं दानवे म्हणाले होते. या व्हीडिओमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

  1. Ambadas Danve on Political Crisis : 'सत्तासंघर्षाचा निकाल दिशादर्शक'
  2. Ambadas Danve On Shinde Govt: शेतकऱ्यांना मदतीपर अनुदान घोषणेचा शिंदे सरकारला विसर - अंबादास दानवे
  3. Ambadas Danve About BJP: महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या चार किंवा पाच जागा मिळतील - अंबादास दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.