ETV Bharat / state

'आधी शहराचे प्रश्न सोडवा, नंतर आम्ही स्वतः नाव बदलाय मदत करू'

author img

By

Published : Feb 16, 2020, 12:01 AM IST

बकाल झालेल्या शहराला महाराजांचे नाव देण्यापेक्षा आधी शहराचा विकास करा मग नाव बदलण्याचा विचार करा. आम्ही स्वतः फाईल घेऊन जाऊ, असे म्हणत एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका केली.

खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करतील, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली होती. त्यावर एमआयएम तर्फे टीका करण्यात आली आहे. मागील तीस वर्षांपासून एकच मुद्दा घेऊन बसले आहेत, विकासाबाबत बोला, अशी टोलेबाजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, या शहराची ओळख पुसत चालली आहे. कचरा आणि खड्ड्यांचे शहर म्हणून शहराला ओळख मिळत आहे. शहराचे नाव बदलण्याची भाषा शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. देशात ज्या शहरांची नावे बदलली त्या शहरांचा विकास किती झाला हे तपासा, शहराचे बदललेले नाव नागरिकांना नको आहे. शहराचे काय?, कचरा कधी स्वच्छ होणार?, शहरासाठी जाहीर केलेली पाण्याची योजना कधी पूर्ण होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत.

हेही वाचा - प्लंबर हत्या प्रकरण : कुख्यात गुंड बाबलासह चौघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.