ETV Bharat / state

Agriculture Minister Abdul Sattar : शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य - अहवालात सोयगाव तालुका नुकसानीत नाही

मराठवाड्यात अनेक भागात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना, 'शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, अनेक वर्षांपासून त्या होत आहेत', असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल.

Agriculture Minister Abdul Sattar
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य
author img

By

Published : Mar 13, 2023, 1:47 PM IST

प्रतिक्रिया देतांना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अनेक भागात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना, 'शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, अनेक वर्षांपासून त्या होत आहेत', असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. याबाबत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली असून; ते अभ्यास करतील, इतकंच नाही तर आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य उपाय योजना करतील आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल असेही सत्तार यांनी सांगितलं.

सत्तार यांच्या मतदार संघात आत्महत्या : राज्यात कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या हा राज्यासमोर भीषण प्रश्न म्हणून उभा राहिला आहे. त्यातच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. रविवारी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरज उदयसिंग शेवगण असे शेतकऱ्याचे नाव असून; त्याची पळसखेडा शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. सतत येणाऱ्या अडचणींमुळे पिके धोक्यात आली. त्यात कर्ज फेडणे अवघड झाले असल्याने, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. नातेवाईकांनी त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

अहवालात सोयगाव तालुका नुकसानग्रस्त यादीत नाही : सतत तीन दिवस अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्यावर, सोयगाव तालुक्यात नुकसानीचा प्राथमिक अहवालात शून्य टक्के नुकसान झाल्याचा कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला. मात्र सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. असं असताना काहीच नुकसान झाले नाही, असं कृषी विभागाने दिलेल्या अहवालात कसे नमूद केले, असा प्रश्न उपस्थित केला जातोय? त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लवकरच मदत मिळेल असा आश्वासन दिलं. रविवारी दिवसभर सोयगाव तालुक्यात आढावा घेतला असून, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक दृष्ट्या मोठे नुकसान झालेली नाही, तरी बरेचसे नुकसान झाल्याचा दिसून येत आहे. आम्ही प्राथमिक माहितीवर मदत जाहीर केली आहे, मात्र आता पंचनामे करून त्यानंतर अंतिम अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार पुन्हा मदत देऊ असा आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं.

हेही वाचा : Strike for Old Pension : उद्यापासून जुन्या पेन्शनसाठी 5 लाख शिक्षक संपावर, परिक्षेवर संपाचे सावट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.