ETV Bharat / state

वंचितसोबत जाण्यासाठी आमची पण तयारी - खासदार इम्तियाज जलील

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली.

खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Sep 24, 2019, 9:05 PM IST

औरंगाबाद- 'लवकरात लवकर वंचितसोबत युतीची घोषणा व्हावी. त्यामुळे आम्हाला फायदा होऊ शकतो. आम्ही देखील सोबत जाण्यास तयार आहोत. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासाठी फक्त ८ दरवाजे उघडे ठेवले. त्यांनी आणखी दरवाजे उघडे केले, तर निश्चित बरे होईल. त्यासाठी त्यांनी ओवैसी यांच्याशी बोलले पाहिजे', असे स्पष्टीकरण एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिले.

खासदार इम्तियाज जलील

हेही वाचा- सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे. निवडणुकीच्या आधी जे आश्वासन सरकारने दिले आहेत त्याबाबत जाब विचारण्याआधी पुलवामा सारख्या काही घटना होतात. सर्वत्र पुलवामा, कलम 370, ट्रिपल तलाक याच्यावर चर्चा व्हायला सुरुवात होते. विकासाचे मुद्दे मात्र मागे पडतात. त्यामुळे विधानसभे निवडणुकीपूर्वी अशा काही घटना झाल्या, तर विकासाचे मुद्दे मागे राहतील. हेच सरकार परत येईल ह्या शरद पवारांचा वक्तव्याशी मी सहमत आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा- आता चर्चेची नाही तर कृतीची गरज, भारतात जलजीवन मिशनची सुरुवात - पंतप्रधान मोदी

वंचित सोबत बोलणे अजूनही शक्य आहे. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी ओवैसी यांना फोन केला, तर पुन्हा एकदा आमच्यासोबत येणे शक्य आहे. आम्ही पर्याय म्हणून लोकांसमोर उभा राहू शकतो. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज वंचित हा उत्तम पर्याय मतदारांसमोर उभा राहू शकतो. आमची एक वेगळी ताकद निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी आता प्रकाश आंबेडकर यांनीच पुढाकार घ्यायची गरज असल्याचे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

आज राज्यात विरोधकच शिल्लक राहिलेला नाही. जे विरोधक आहेत, त्यांचे नेते आज भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रखर विरोध राहिलेला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आगामी काळात एमआयएमतर्फे आम्ही मुस्लिम व्यतिरिक्त इतर समाजाच्या उमेदवारांना देखील संधी देणार आहोत. आमच्याकडे मुस्लिम वगळता इतर समाजाच्या अनेक उमेदवारांनी एमआयएमतर्फे निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवलेली आहे. अद्याप प्रकाश आंबेडकरांनी कुठलीही बोलणी केलेली नाही. त्यांनी बोलणी केली तर आम्ही आमच्या उमेदवारांची घोषणा थांबवू आणि जागावाटपानुसार आम्ही उमेदवारांची घोषणा करू. मात्र, तत्पूर्वी आम्ही आमच्या उमेदवारांची यादी आता जाहीर करायला सुरुवात केलेली आहे.

हेही वाचा- अ‌ॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक

सोलापूरमधून आम्ही मुस्लिम सोडून इतर समाजाच्या उमेदवारांना देखील उमेदवारी दिलेली आहे. मुस्लिमच नाही तर आमच्याकडे मराठा समाजाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केले असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. आज शरद पवार सांगत आहेत की, पुलवामासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही तर राज्यात निश्चित बदल घडेल हे तितकच सत्य आहे. विकासाचे मुद्दे मागे राहतात. ज्या घोषणा सरकारने केल्या होत्या त्या घोषणांवर जाब विचारण्यापूर्वीच अशा काही घटना होतात. त्याच घटनांवर सर्व निवडणुका या फिरायला लागतात. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन त्यांनी केले. ईडी किंवा अन्य चौकशी लावण्याची भीती घातली जात आहे. राजा विरुद्ध बोलले तर काय होते हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे सरकार कुठेतरी अशा भीती घालून सर्वांना घाबरवत आहे. राज ठाकरे यांच्या मागे ज्या पद्धतीने चौकशीचे सत्र सुरू आहे. त्यानुसार हे भीती घालण्याचे काम आहे, असे देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Intro:लवकरात लवकर वंचित सोबत युतीची घोषणा व्हावी त्यामुळे आम्हाला फायदा होऊ शकतो आम्ही देखील सोबत जाण्यास तयार आहोत, मात्र प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासाठी फक्त आठ दरवाजे उघडे ठेवले त्यांनी आणखी दरवाजे उघडे केले तर निश्चित बरं होईल आणि त्यासाठी त्यांनी ओवैसी साहेबांशी बोललो पाहिजे असं स्पष्टीकरण एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्ये दिल.

Body:शरद पवारांनी केलेले वक्तव्याशी मी सहमत आहे. निवडणुकीच्या आधी जे आश्वासन सरकारने दिले आहेत त्याबाबत जाब विचारण्या आधी पुलवामा सारख्या काही घटना होतात आणि सर्वत्र पुलवामा, कलम370, ट्रिपल तलाख यांवर चर्चा व्हायला सुरुवात होते आणि विकासाचे मुद्दे मात्र मागे पडतात त्यामुळे विधानसभेच्या या निवडणुकीच्या आधी अशा काही घटना झाल्या तर विकासाचे मुद्दे मागे राहतील आणि हीच सरकार परत येईल हे शरद पवारांचा वक्तव्याशी मी सहमत आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली.

Conclusion:वंचित सोबत बोलली अजूनही शक्य आहे मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुढाकार घ्यायला हवा त्यांनी जर ओवैसी यांना फोन केला तर पुन्हा एकदा आमच्या सोबत येणे शक्य आहे. आम्ही पर्याय म्हणून लोकांसमोर उभा राहू शकतो. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आता संपुष्टात येत आहे, त्यामुळे आज वंचित हा उत्तम पर्याय मतदारांसमोर उभा राहू शकतो. एक वेगळी ताकद आमची निर्माण होऊ शकते, मात्र त्यासाठी आता प्रकाश आंबेडकर यांनीच पुढाकार घ्यायची गरज असल्याचे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. आज राज्यात विरोधकच शिल्लक राहिलेला नाहीये जे विरोधक आहेत, त्यांचे नेते आज भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रखर विरोध राहिलेला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. आगामी काळात एमआयएम तर्फे आम्ही मुस्लिम व्यतिरिक्त इतर समाजाच्या उमेदवारांना देखील संधी देणार आहोत. आमच्याकडे मुस्लिम वगळता इतर समाजांच्या अनेक उमेदवारांनी एमआयएम तर्फे निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी कुठलीही बोलणी अद्याप केलेली नाही त्यांनी बोलणी केली तर आम्ही आमच्या उमेदवारांची घोषणा थांबून देऊ आणि जागावाटप अनुसार आम्ही उमेदवारी आमची घोषित करू, मात्र तत्पूर्वी आम्ही आमच्या उमेदवारांची यादी आता जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. सोलापूर मधून आम्ही मुस्लिम सोडून इतर समाजाच्या उमेदवारांना देखील उमेदवारी दिलेली आहे. मुस्लिम नाही तर आमच्याकडे मराठा समाजाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे केले असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. आज शरद पवार सांगत आहेत की पुलवामा सारखी परिस्थिती निर्माण झाली नाही तर राज्यात निश्चित बदल घडेल हे तितकंच सत्य आहे. विकासाचे मुद्दे मागे राहतात. ज्या घोषणा सरकारने केल्या होत्या त्या घोषणांवर जाब विचारण्या आधीच अशा काही घटना होतात आणि त्याच घटनांवर सर्व निवडणुका या फिरायला लागतात. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समर्थन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ईडी किंवा अन्य चौकशी लावण्याच्या भीती हे घातली जात आहे. राजा विरुद्ध बोललं तर काय होतं हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे सरकार कुठेतरी अशा भीती घालूनच सर्वांना घाबरत आहे. चीतंबर सारखे किंवा राज ठाकरे असेल त्यांच्या मागे ज्या पद्धतीने चौकशाचे सत्र सुरू आहे. त्यानुसार हे भीती घालण्याचं काम असून यामध्ये आता सर्वच राजकीय पक्ष किती मध्ये जगत आहेत अस देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.
1to1
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.