औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. औरंगाबादमध्ये आज भाजप आमदार तथा सहकार मंत्री अतुल सावे Cooperation Minister Atul Save यांच्या घराबाहेर शिवभक्तांकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अतुल सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच आंदोलकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याची हमी दिली आहे.
आंदोलनाची सुरुवात: राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय नेत्यांच्या घरासमोर आठवडाभर ढोल बजाव आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्च्याकडून करण्यात आली आहे. तर या आंदोलनाची सुरुवात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून करण्यात आली आहे. सावे यांच्या औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा येथील घरासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे. तर यावेळी मंत्री सावे यांना, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ? असा जाब विचारण्यात आला आहे.
काय म्हणाले होते : स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. लाड यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली (Prasad Lad controversial statement Shivaji Maharaj) होती.
राज्यपालांमुळे मंत्री गोत्यात...: नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल बोलतांना 'छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असून, नितीन गडकरी सध्याचे आदर्श असल्याचं, वक्तव्य केले होते. त्यांच्या याच विधानावरून राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत असून, शिवभक्त आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मंत्र्यांच्या घरासमोर शिवभक्त आंदोलन करून, जाब विचारत असल्याने मंत्री गोत्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे फडणवीस सरकारचे 3 आणि केंद्राचे 2 मंत्री राहतात. त्यामुळे या पाचही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्च्याकडून सांगण्यात आले आहे.