ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, बळीराजाची पेरणीसाठी लगबग - औरंगाबाद शेतकरी पेरणी न्यूज

औरंगाबादमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

aurangabad
औरंगाबाद
author img

By

Published : Jun 2, 2021, 5:55 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा पेरणी करण्यात व्यस्त आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच शेती मालाचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. असे असतानाही पेरणीसाठी लागणाऱ्या रासायनिक खते, बियाणांसाठी बळीराजा आर्थिक जुळवाजुळव करून पेरणीच्या तयारीला लागला आहे.

औरंगाबादमध्ये पेरणीला सुरुवात

बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी

तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा कृषी दुकानातून, मका, तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या बियाणे खरेदीसाठी; तसेच रासायनिक खते घेण्यासाठी दुकानात गर्दी करत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही

खरिप हंगाच्या मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी व पेरणीसाठी लगबग करताना दिसून येत आहेत. मात्र, बियाणे खरेदी व लागवडीबाबत कृषी विभागकडून शेतकऱ्यांना अद्याप कुठलेच मार्गदर्शन केले नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात पहिल्या, दुसऱ्या लाटेशी 64 गावांनी दिली फाइट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.