ETV Bharat / state

वाळूचोरी थांबविण्यात प्रशासन अपयशी - sand mining news

गोदावरी नदी पात्रात हायवा ट्रक उतरवून वाळूचोरी होत असल्याची माहिती नागरीकांनी प्रशासनाला दिली. तरीही तहसील प्रशासनाने फक्त एका वाहनावर कारवाई केली आहे. तहसील प्रशासनाला नागरिक या भागात वाळूचोरी होत असल्याची माहिती देतात परंतू अल्पशी रक्कम घेतल्याने या वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचा आरोप आहे.

वाळूचोरी थांबविण्यात प्रशासन अपयशी
वाळूचोरी थांबविण्यात प्रशासन अपयशी
author img

By

Published : Jun 7, 2021, 12:09 PM IST

पैठण- शहरात सध्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. जागतिक पर्यावरण संरक्षण दिनाच्या पूर्वसंधेला कावसान येथे गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचोरी होत असताना नागरीकांना आढळून आले. आठ यारी यंत्राची जुळवनी करुन गोदावरी पात्रात हायवा ट्रक उतरवून वाळूचोरी होत आहे.अशी माहीती नागरीकांनी प्रशासनाला दिली. पुराव्यांसह माहीती मिळूनही प्रशासनाने कारवाईत दिरंगाई केल्याने, प्रशासन यामध्ये सहभागी आहे का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

वाळूचोरी थांबविण्यात प्रशासन अपयशी

कावसान परिसरातून वाळूचोरी

कावसान येथे जवळपास आठ यारी यंत्र नागरीकांना दिसून आले. गोदावरी नदी पात्रात हायवा ट्रक उतरवून वाळूचोरी होत असल्याची माहिती नागरीकांनी प्रशासनाला दिली. तरीही तहसील प्रशासनाने फक्त एका वाहनावर कारवाई केली आहे. तहसील प्रशासनाला नागरिक या भागात वाळूचोरी होत असल्याची माहिती देतात परंतू अल्पशी रक्कम घेतल्याने या वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचा आरोप आहे.

पैठण तालुक्यात वाळूउपसा

गेल्या काही महिन्यांपासून पैठण तालुक्यात वाळूउपशाचे प्रमाण वाढले असताना अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर शहर परिसरातील नदीतून वाळूचा सर्रास उपसा करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाचा चोख बंदोबस्त असताना देखील हे घडत आहे. पैठण तालुक्यात सध्या एकाही वाळूउपशाला परवानगी नाही, तरी देखील अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. प्रशासनाची यंत्रणा गावपातळीपर्यंत असतानाही अवैध वाळूचोरी बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

हेही वाचा-पंढरपूर; वाळू चोरी प्रकरणातील 36 गाढवे निघाली उटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.