ETV Bharat / state

बाहेरगावाहुन आलेल्या नातेवाईकांची माहिती लपवून कायद्याचे उल्लंघन; गुन्हा दखल

सिल्लोड येथील एका कुटुंबाकडे नाशिकहुन २० एप्रिलपासून काही लोकं राहण्यासाठी आले. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून आल्यानंतर सदर माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असतानाही ती न देता लपवून ठेवली. तसेच, कोव्हीड -१९ या संसर्गजन्य संसर्ग रोगासंबधी तपासणी आवश्यक असतानाही त्यांनी ती केली नाही. यामुळे शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बाहेरगावाहुन आलेल्या नातेवाईकांची माहिती लपवली

author img

By

Published : May 3, 2020, 9:08 AM IST

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही दुसऱ्या जिल्ह्यातून आल्यानंतर माहिती लपवल्यामुळे, सिल्लोड शहरातील जयभवानी नगर येथील एका कुटुंबावर गुन्हा दाखल करून घरातील सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सिल्लोड येथील एका कुटुंबाकडे नाशिकहुन २० एप्रिलपासून त्यांचा मुलगा, सून आणि नात राहण्यासाठी आले. मात्र, बाहेरगावाहुन आल्यानंतर तपासणी आवश्यक असतानाही त्यांनी कोव्हीड -१९ या संसर्गजन्य संसर्ग रोगासंबधी तपासणी केली नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आल्यानंतर सदर माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असतानाही ती न देता लपवून ठेवली. तसेच सिल्लोड शहरात येण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही. यामुळे शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सिल्लोड शहरातील जयभवानी नगर परिसरातील (नर्सरी परिसर) एका कुटुंबात मालेगाव जिल्हा नाशिक येथून काही व्यक्ती आले असल्याची माहिती नगर परिषदेला मिळाली. प्राप्त माहितीप्रमाणे उपमुख्याधिकारी एबी पठाण यांनी प्रशासकीय अधिकारी अजगरखान रशिदखान पठाण यांना तपासणी करून खात्री करण्याचे सूचित केले. आदेशप्रमाणे पठाण यांनी नगर परिषदेचे सहकारी कमलाकर मिंगाळकर कनिष्ठ लिपीक, गोरख घाडगे पाणि पुरवठा लिपिक यांना सोबत घेवून चौकशीसाठी गेले. पथकाने या कुटुंबाची विचारपुस केली असता त्यांच्या घरी मुलगा जगदीश, सून ऊषा व नात आल्याचे निष्पन्न जाले. यानंतर, शनिवारी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गतीने पसरत असलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ०३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. तसेच, या काळात कोणीही कुठेही जावू नये असा प्रशासकीय आदेश काढलेला आहे. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कुटुंबावर विविध कलमांप्रमाणे फिर्यादीनुसार सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.