ETV Bharat / state

पिशोर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपीला अटक - Pishor Police News

पिशोर पोलीस ठाण्याचे बीट जमादार संदीप कणकुटे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी फकिरा डिघोळे याला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर कलमांतर्गत आरोपी डिघोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pishor Police Station
पिशोर पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 20, 2020, 5:01 PM IST

कन्नड(औरंगाबाद) - पिशोर पोलीस ठाण्याच्या बीट जमादाराला धमकी देऊन धक्काबुक्की केल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील निंभोरा या गावी शुक्रवारी घडला. याप्रकरणी आरोपी फकिरा कोंडीबा डिघोळे (रा. निंभोरा) याला अटक करण्यात आली आहे. पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील वासडी येथे बीट जमादार संदीप कणकुटे हे शुक्रवारी(ता.19) दुचाकीने विविध कार्यकारी सोसायटी, निंभोरा यांचे तक्रारी अर्जाच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. निंभोरा येथील चौकशी पूर्ण करुन पोलीस ठाण्यात परत येत असताना शुक्रवारी संदीप कणकुटे यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली, अशी माहिती पिशोर पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ उंबराच्या झाडाच्या खाली काहीतरी वाद चालू होता. लोकांची बरीच गर्दी जमलेली असल्याने संदीप कणकुटे यांनी जवळ जाऊन माहिती घेतली.यावेळी लक्ष्मण तान्हाजी सोनवणे, गणेश सोनवणे, सुनिल दणके,अंकुश सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत सोनवणे यांच्या समक्ष तेथे दोन भावांत शेती नावावर करण्याच्या कारणावरुन वाद सुरू होता. यावेळी कणकुटे यांनी दोघा भावांना वाद न करण्याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी फकिरा डिघोळे याने कणकुटे यांना तुला इथे येण्याचा काय अधिकार?, तु मला ओळखले नाही, मला जेलमध्येच टाक, तुला मी कायदा दाखवतो, मी तुला सोडणार नाही, अशी दमबाजी केली व अरेरावीची भाषा करुन शिवीगाळ केली.

या दरम्यान डिघोळे याने कणकुटे यांच्याशी झटापट केली.या झटापटीमध्ये पोलीस कर्मचारी कणकुटे यांच्या गळ्यावर व छातीवर ओरखडल्याच्या जखमा झाल्या. डिघोळे याने पोलिसांची वर्दी व वर्दीवरील चिन्ह फाडून टाकले. जमलेल्या लोकांच्या मदतीने कणकुटे यांनी आरोपीस पकडले. पोलीस नाईक संदीप कणकुटे यांच्या तक्रारीवरून फकिरा कोंडिबा डिघोळे (वय ४५ वर्षे रा. निंभोरा) याच्याविरुद्ध शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे व इतर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार हे अधिक तपास करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.