औरंगाबाद - औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर आहे. शहराच्या नावाला हात लावाल तर याद राखा, असा सज्जड दम समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगाबादेत हिंदुत्ववादी संघटनांना दिला. ते सप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.
औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे सपचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्या प्रचारासाठी सप नेते आमदार अबू आझमी हे शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. किराडपुरा भागात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना-भाजपकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. औरंगाबादकरांना निवडणुकीच्या काळात हा मुद्दा नवीन राहिलेला नाही. मात्र, या वादात आता सपचे नेते अबू आझमी यांनी देखील उडी घेतली आहे. औरंगाबाद हा ऐतिहासिक शहर असून या शहराचे नामकरण करण्यास कोणाच्या बापात हिम्मत नाही. या शहराच्या नावाला हात लावाल तर याद राखा, असा सज्जड दमच या सभेत आझमी यांनी शिवसेना-भाजपचे नाव न घेता दिला.
हेही वाचा - काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांमुळे आघाडीत बिघाडी; समाजवादी नेत अबू आजमी यांचा आरोप