ETV Bharat / state

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून अब्दुल सत्तारांची माघार, काँग्रेसचा प्रचार न करण्याची घेतली भूमिका - काँग्रेस

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून अब्दुल सत्तारांनी माघार घेतली आहे. तसेच या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय १५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार
author img

By

Published : Apr 8, 2019, 5:37 PM IST

औरंगाबाद - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी अर्ज मागे घेतला असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.

अब्दुल सत्तार

औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी काँग्रेसने न दिल्याने सत्तारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत त्यांनी आमखास मैदान येथे जाहीर सभा घेत आपली भूमिका जाहीर केली. या सभेत काँग्रेसचे नाराज खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी देखील सत्तारांना पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाने उमेदवारी बदलून सत्तारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. काँग्रेस पक्ष बंडाची दखल घेऊन उमेदवारी देईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, पक्षाने सुभाष झांबड यांना ब फॉर्म देत त्यांच्या आशेवर पाणी फेरले.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यास मतांचे विभाजन होईल, त्यामुळे मी उमेवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय १५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.

Intro:कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. Body:अर्ज मागे घेतला असला तरी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करणार नाही अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली. Conclusion:औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी कॉंग्रेसने न दिल्याने आमदार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कॉंग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा सत्तार यांनी देत आमखास मैदान येथे जाहीर सभा घेत आपली भूमिका जाहीर केली. या सभेत कॉंग्रेसचे नाराज खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी देखील सत्तार यांना पाठींबा जाहीर केला होता. कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी बदलून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. कॉंग्रेस पक्ष बंडाची दखल घेऊन उमेदवारी देईल अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांना होती. मात्र कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना ब फॉर्म देत सत्तारांच्या आशेवर पाणी फेरले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यास मतांचं विभाजन होईल त्यामुळे उमेवारी अर्ज मागे घेत असल्याच सांगत अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कॉंग्रेसचा प्रचार करणार नाही मात्र कोणाला पाठींबा द्यायचा याबाबत १५ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अस सत्तार यांनी सांगितलं.
byte - अब्दुल सत्तार - कॉंग्रेस नाराज आमदार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.