ETV Bharat / state

Aaditya Thackeray Convoy : औरंगाबादजवळ आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक

author img

By

Published : Feb 7, 2023, 10:21 PM IST

Updated : Feb 7, 2023, 10:54 PM IST

औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. महालगाव येथे आदित्य ठाकरे तसेच रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Stone Pelted On Aditya Thackeray Car
Stone Pelted On Aditya Thackeray Car

औरंगाबाद (वैजापूर) : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं समजते आहे. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाली. अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचे समोर आले आहे. यामुळे काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

सभेच्या दिशेने किरकोळ दगडफेक : आदित्य ठाकरे आज महालगाव, वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा झाली. त्यावेळी त्यांच्या गाडीवर आणि सभेच्या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. महालगाव येथे शिवसंवाद यात्रेचा मेळावा होत असताना या बाजूलाच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. सभा सुरु असल्याने बाजूला रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेली मिरवणूक, डीजे थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकले.

आदित्य ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न : परिसरात तणाव झाल्याचे बघता यावेळी चंद्रकांत खैरेंनी आपले भाषण आटोपते घेतले. आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केले. भाषणाच्या सुरवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असे देखील म्हटले. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

हेही वाचा - Pravin Togadia on Hindu : भारतात हिंदू सुरक्षित नाहीत; प्रवीण तोगडिया यांचे वादग्रस्त विधान

Last Updated : Feb 7, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.