ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीला पळवून नेत विविध ठिकाणी अत्याचार, शेजारी राहणारा आरोपी अटकेत - अल्पवयीन मुली

घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले. त्यानंतर विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सिडको परिसरात घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सिडको पोलीस ठाणे
सिडको पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 30, 2021, 8:01 PM IST

औरंगाबाद - सिडको परिसरातील अल्पवयीन मुलीला शेजारी राहणाऱ्या तरुणाने पळवून नेत तिच्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना घडली होती. यातील आरोपीला सिडको पोलिसांनी सोमवारी (दि.27) रात्री बेड्या ठोकल्या.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी व 18 वर्षीय आरोपी हे शेजारी राहतात. 24 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडितेची आई कामाला गेली होती. त्‍यावेळी मुलगा आणि मुलगी दोघेच घरी होते. पीडितेची आई कामावरून सायंकाळी पाच वाजेच्‍या सुमारास घरी आल्या असता मुलगी घरी नव्हती. यावेळी मुलाला विचारले असता पीडिता ही दुपारी दोन वाजता मैत्रीणीकडे जाऊन येते, असे सांगून गेल्याचे त्याने सांगितले. पण, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती परतली नसल्याने पीडितेच्या आईने तिचा शोध घतेला. पण, ती सापडली नाही. नंतर सिडको पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने हरवल्याबाबतची तक्रार दिली होती.

पोलिसांनी शोध घेतल्यास आरोपी व पीडिता सापडले. यावेळी पीडितेची चौकशी केली असता आरोपीने तिला पळवून नेत विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा जबाब पीडितेने दिला आहे. यावरुन पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा - VIDEO : नागझरी नदीला आलेल्या पुरात दोन युवक गेले वाहून, पोहता येत असल्याने वाचला जीव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.