वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील लोणी (बु) येथे १३ वर्षीय मुलीवर गावातीलच एका तीस वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ तारखेला पहाटेच्या सुमारास घडली. जमील अझर शेख (वय ३०, रा.लोणी (बु)) असे घटनेतील आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा चुराडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही लोणी (बु) येथे तिच्या आई वडिलांसह वास्तव्यास आहे. गावातच आरोपी जमील अझर शेख याचे किराणा दुकान आहे. पीडिता ही नेहमी जमील याच्या दुकानावर किरणा सामान खरेदी करण्यासाठी जात असे. दरम्यान, जमील हा पीडित मुलीला नेहमी म्हणत असे की, 'तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे' मात्र ती त्याच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत असे.
११ मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे मुलगी व तिचे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पीडितेच्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवर एक कॉल आला. त्यावेळी मुलीने फोन उचलला व कोण बोलत आहे? अशी विचारणा केली. 'मी जमील दुकानदार बोलत आहे, तू आत्ताच मला भेटायला ये, अन्यथा तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकील' असे त्याने तिला धमकावले. मात्र, मुलीने घाबरून कॉल कट केला. थोड्याच वेळाने पुन्हा त्याच नंबरहून फोन कॉल आला व त्याने सांगितले की, 'तू माझ्याघरी मला भेटायला ये' दरम्यान त्याने पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिल्याने तिची इच्छा नसताना ती जमील याच्या घरी रात्री दीड वाजेच्या सुमारास गेली. यावेळी जमील याने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात जमील अझर शेख याच्याविरुद्ध बलात्कारासह, अट्रॉसिटी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हफ्ता वसूलीसाठी आलेल्या रिकव्हरी एजंटने अल्पवयीन मुलीला दिली 'आय लव यू'ची चिठ्ठी