ETV Bharat / state

धक्कादायक! औरंगाबादमध्ये पैशाच्या वादातून चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या - Aurangabad murder

विकलेल्या स्कुटीच्या पैशावरून झालेल्या वादानंतर एका मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री १२ च्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलनी भागात घडली.

पैशाच्या वादावरून मैत्रीणीने चाकूने भोसकून मैत्रिणीची केली हत्या
author img

By

Published : Nov 25, 2019, 2:57 PM IST

औरंगाबाद - विकलेल्या स्कुटीच्या पैशावरून झालेल्या वादानंतर एका मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री १२ च्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलनी भागात घडली. दोन्ही महिला या जिवाभावाच्या जुन्या मैत्रिणी होत्या. या घटनेमुळे दोन्ही परिवाराला मोठा धक्का बसला आहे. विद्या चंद्रकांत तळेकर (वय- २९ कचिवाडा, चेलीपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शकीला उर्फ निलोफर शेख (रा.सेंट्रल नाका) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पैशाच्या वादावरून मैत्रीणीने चाकूने भोसकून मैत्रिणीची केली हत्या

सविस्तर वृत्त असे की, विद्याने मैत्रीण शकीलाला तिची जुनी स्कुटी विकली होती. त्या स्कुटीच्या पैशासाठी काल रात्री विद्या ही शकीलाच्या घरी सेंट्रल नाका भागात गेली होती. त्यावेळी दोन्ही मैत्रिणीत स्कुटीच्या पैशाच्या देवाण-घेवाणी वरून वाद झाला. या वादानंतर शकीलाने घरातील धारदार चाकूने विद्याच्या पोटात, छातीत आणि मांडीवर वार केले. त्यानंतर विद्या रक्तबंबाळ जमिनीवर अवस्थेत जमिनीवर कोसळली व जागीच तिचा मृत्यू झाला. यानंतर शकीलाने विद्याच्या भावाला फोन करून तिचा अपघात झाल्याची माहिती देत खासगी रुग्णालयात हलविले.

डॉक्टरांनी विद्याला मृत घोषित केले. त्यानंतर शकीला काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी शकीलाला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शकीलाला अटक केली. तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मृत विद्याचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

Intro:विकलेल्या स्कुटी च्या पैशावरून झालेल्या वादावादी नंतर एका मैत्रिणीनेच मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री 12 च्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलोनी भागात घडली. दोन्ही महिला या जिवाभावाच्या जुन्या मैत्रिणी होत्या या घटनेमुळे दोन्ही परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
विद्या चंद्रकांत तळेकर वय-29 (कचिवाडा, चेलीपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शकीला उर्फ निलोफर शेख (रा.सेंट्रल नाका) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

Body:या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विद्या ने मैत्रीण शकीलाला तिची जुनी स्कुटी विकली होती, त्या स्कुतीच्या पैशा साठी काल रात्री विद्या ही शकीलाच्या घरी सेंट्रल नाका भागात गेली होती.त्यावेळी दोन्ही मैत्रिणी मध्ये स्कुतीच्या पैशाच्या देवाण घेवाणी वरून वाद झाला वादावादी नंतर शकीलाने घरातील धारदार चाकू विद्या च्या पोटात छातीत आणि मांडीवर भोसकले या सुमारे चार ते पाच वार केला नंतर विद्या जमिनीवर रक्तबंबाल अवस्थेत जमिनीवर कोसळली व जागीच तिचा मृत्यू झाला या नंतर शकीलाने विद्या च्या भावाला कॉल करून तिचा अपघात झाल्याची माहिती देत विध्याला खाजगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले त्यानंतर शकीला काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी शकीलाला बेदम मारहाण केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शकीलाला अटक केली तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मृत विध्याचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता अशा प्रकारे मैत्रीनेचं चाकूने भोसकून हत्या केल्याने नातेवाईकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.