औरंगाबाद - वाळूज औद्योगिक परिसरात आर्थिक विवंचनेतून उद्योजकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विष्णू कळवणे (वय 53 वर्षे), असे आर्थिक मंदीमुळे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे.
विष्णु कळवणे यांचा गाड्यांच्या सुट्या भागांना पॉलिश करण्याचा उद्योग होता. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या कारखान्याने त्यांचे पैसे दिले नव्हते. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार थकला होता. कारखाण्याकडून बिलही येत नाही. त्यात 7 महिन्यांपासून जीएसटी भरला नसल्याने, नोटीस येत होत्या. या सगळ्यामुळे ते प्रचंड तणावात होते. त्यातच त्यांनी मुलीला व्हॉट्सअप चिठ्ठी पाठवून आपली ही सगळी अडचण कळवली. पैसै नाही, जीएसटी भरायचा आहे, कामगाराचां पगार करायचा आहे. यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी आत्महत्या केली.
जीएसटीचा फेरा, कमी झालेला व्यवसाय, कामगारांचे पगार यातून नैराश्य आले आणि या उद्योजकान आपले आयुष्य संपवले, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. यातून तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. त्यामुळे अडचणीतील या छोट्या उद्योजकांना कशी मदत करता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे. दरम्यान उद्योजक सगळेच अडचणीत आहेत, त्यात पैसै नसल्याने अनेक जण वैतागले असल्याची भावना उद्योजक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - सावकारी कर्ज आणि नापिकीला कंटाळून 28 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या