ETV Bharat / state

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून कोरोनाबधित रुग्णाचे पलायन, नवे 72 रुग्ण सापडले - aurangabad news in marathi

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घाटी रुग्णालयातून सकाळी पळ काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असताना रुग्ण पळाला कसा ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे मंगळवारी सकाळी जिल्ह्यात कोरोनाचे नवे 72 रुग्ण आढळून आले आहेत.

72 more corona cases found in aurangabad
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून कोरोनाबधित रुग्णाचे पलायन, आज नवे 72 रुग्ण
author img

By

Published : Jun 9, 2020, 10:45 AM IST

औरंगाबाद - गणेश नगर येथील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घाटी रुग्णालयातून सकाळी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असताना असताना रुग्ण पळाला कसा ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 72 रुग्ण आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयात गणेश नगर येथील 38 वर्षीय रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्या रुग्णाने पळ काढला. दरम्यान, सोमवारी हर्सूल कारागृहाचे दोन कोरोनाबधित रुग्ण पळून गेल्याची घटना ताजी असताना घाटीतील घटनेने, प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 72 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 141 झाली आहे. यापैकी 1 हजार 253 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू आहे. सद्य स्थितीत 780 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्म‍िला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1), बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), समता नगर (2), पडेगाव (1), रोहिणी नगर (1), न्याय नगर (1), गादिया ‍विहार (2), शिवाजी नगर (1), गारखेडा परिसर (3), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (2), व्हीआयपी रोड, काळीवाडा (1), सिटी चौक (2), युनुस कॉलनी (1), नूतन कॉलनी (1), रवींद्र नगर (1), दशमेश नगर (1), अरिहंत नगर (1), विद्या नगर (1), एन चार , गुरू साहनी नगर (1), अंबिका नगर (1), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा, सिडको (1) कैलास नगर (1), रोकडा हनुमान कॉलनी (1), जटवाडा रोड परिसर (1), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 46 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - खळबळजनक..! कोविड सेंटरमधून हर्सुल कारागृहातील २ कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

हेही वाचा - जायकवाडी धरणातील पाणीपातळी 38 टक्क्यांवर; बाष्पीभवन अधिक झाल्याने पातळीत घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.