औरंगाबाद - उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस बाकी असल्याने गुरुवारी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघात दिवसभरात 60 उमेदवारांनी 80 अर्ज दाखल केले. फुलंब्री मतदार संघातून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पूर्व मतदार संघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये औरंगाबाद पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाठ, फुलंब्री मतदार संघातून माजी आमदार कल्याण काळे, एमआयएमतर्फे पूर्व मतदार संघातून गफार कादरी, पश्चिम मतदार संघातून अरुण बोर्डे यांचा समावेश आहे.
हेही वाचा - अब्दुल सत्तारांसाठी भाजपने सोडला हक्काचा मतदारसंघ !
सिल्लोड येथून सहा उमेदवारांनी सात, कन्नड येथून चार उमेदवारांनी सहा, फुलंब्रीतून आठ उमेदवारांनी नऊ, औरंगाबाद मध्यमधून तीन उमेदवारांनी तीन, औरंगाबाद पश्चिममधून पाच उमेदवारांनी नऊ, औरंगाबाद पूर्वमधून 11 उमेदवारांनी 16, पैठण येथून पाच उमेदवारांनी सात, गंगापूर येथून सात उमेदवारांनी नऊ आणि वैजापूर येथून 11 उमेदवारांनी 14 असे एकूण 60 उमेदवारांनी 80 उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा - कामठीतून बावनकुळेंनाच उमेदवारी द्या; सुलेखा कुंभारेंची जाहीर मागणी
गुरूवारी सकाळपासूनच शहरात सर्वच उमेदवारांच्या रॅलीमूळे सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह दिसून येत होता. सकाळी राज्यमंत्री अतुल सावे यांनी पहिली रॅली काढली. तर दुपारी केंब्रिज शाळेपासून हरिभाऊ बागडे यांनी रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला.