औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 54 रुग्ण समोर आले आहेत. गुरुवारी सकाळी 14, दुपारी 7, तर सायंकाळी 33 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 184 झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागात आढळून आलेले रुग्ण -
संजयनगर मुकुंदवाडी - 18, नूर कॉलनी - 2, खडकेश्वर - 1, बीडबायपास - 1, रोहिदास नगर - 2, नारेगाव अजीज कॉलनी - 2, रोशन गेट - 1, भीमनगर - 3, किलेअर्क - 9, जयभीम नगर भावसिंग पुरा - 6, असेफिया कॉलनी - 2, नूर कॉलनी - 3, कैलासनगर - 1, चिकलठाणा -1, सावरकर नगर - 1, घाटी परिसर - 1