ETV Bharat / state

औरंगाबाद : 23 वर्षाच्या अमृतने आणलं संपूर्ण पॅनल निवडून; आई झाली सरपंच

तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत मानली जाणाऱ्या गावात मात्र एक रोमांचक निवडणूक पाहायला मिळाली. या गावाची लोकसंख्या 666 इतकी आहे. भालगाव हे गाव औरंगाबाद-नगर जिल्ह्याच्या सीमेस वसलेले आहे. या गावात बरीच विकासकामे प्रलंबित आहेत.

author img

By

Published : Feb 13, 2021, 7:18 PM IST

Updated : Feb 13, 2021, 8:08 PM IST

23 year old youth won grampanchayat election aurangabad
23 वर्षाच्या अमृतने आणलं संपूर्ण पॅनल निवडून

औरंगाबाद - संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या. सरपंच, उपसरपंच पदाची सोडतही जाहीर झाली. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण या 2 तालुक्यांच्या निवडणुका गाजल्या. कारण, न्यायप्रविष्ट असल्याने याला अवधी थोडा जात लागला. मात्र, अखेर औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यासह संपुर्ण गावचे सरपंच, उपसरपंच जाहीर झाले. त्यामधील वैजापूर तालुक्यातील भालगांव ग्रामपंचायत ही बहुचर्चित ठरली.

अमृत शिंदे याबाबत प्रतिक्रिया देताना.

तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत मानली जाणाऱ्या गावात मात्र एक रोमांचक निवडणूक पाहायला मिळाली. या गावाची लोकसंख्या 666 इतकी आहे. भालगाव हे गाव औरंगाबाद-नगर जिल्ह्याच्या सीमेस वसलेले आहे. या गावात बरीच विकासकामे प्रलंबित आहेत. त्याचाच विचार करत फक्त 23 वर्षाच्या अमृत शिंदे यांनी गाव भ्रष्टाचारी कामात गुंतलेले पाहून महाविकास आघाडीचे सूत्र वापरुन बदल करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या पॅनेलचे नाव बदलून ग्रामविकास आघाडी असे केले. या पॅनेलमध्ये त्यांनी आपली आई, स्वतः आणि सर्व लोकांशी चर्चा केली. गावाची प्रबळ साथ असणाऱ्या अमृतने स्वतः हा निवडणूक लढवली. तसेच आईलासुद्धा लढवायला लावले.

23 year old youth won grampanchayat election aurangabad
अमृत शिंदे आणि त्यांच्या आई.

हेही वाचा - कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या; बायकोला हाकावा लागतोय कुटुंबाचा गाडा

विशेष म्हणजे हे दोन्हीही बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर आता त्यांच्या आई या सरंपचपदी विराजमान झाल्या आहेत. अमृत शिंदे यांच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.