औरंगाबाद - जिल्ह्यात शनिवारी सकाळी 23 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या 1,241 झाली आहे. तर मृतांची संख्या 45 वर गेली आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सादाफ नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), महेमूदपुरा (1), औरंगपुरा (1), एन-8 (1), एन-4, गणेश नगर (1), ठाकरे नगर, एन-2 (2), न्याय नगर (3), बायजीपुरा (1), पुंडलिक नगर (2), बजरंग चौक, एन-7 (3), एमजीएम परिसर (1), एन-5 सिडको (1), एन 12, हडको (1) पहाडसिंगपुरा (1), भवानी नगर (1), वडगाव कोल्हाटी (1) या भागांत कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 21 मे रोजी 41 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. बहादूरपुरा येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा 22 मे रोजी पहाटे 3.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे. तर महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अशा एकूण 45 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
औरंगाबादेत आज आढळले कोरोनाचे नवे 23 रुग्ण, मृतांचा आकडा 45वर - औरंगाबाद कोरोना अपडेट
औरंगाबादमध्ये आज सकाळी 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १,२४१ झाली आहे.