ETV Bharat / state

दूषित पाण्याने औरंगाबाद विद्यापीठातील १७० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली, विद्यार्थ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन - विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुलींच्या वसतिगृहांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करून विद्यापीठातील प्रत्येक वसतिगृह आणि ग्रंथालयामध्ये आर-ओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन
author img

By

Published : May 4, 2019, 11:41 AM IST

औरंगाबाद - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल १७० विद्यार्थिंनींची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. मुलींच्या वसतिगृहांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करून विद्यापीठातील प्रत्येक वसतिगृह आणि ग्रंथालयामध्ये आर-ओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात एकूण सात मुलींचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी आलेल्या परजिल्ह्यातील शेकडो विद्यार्थिनी राहतात. गेल्या दोन दिवसांपासून या सातही वसतिगृहातील विद्यार्थिनी आजारी पडत होत्या, अशा एकूण १७० विद्यार्थिनी आजारी पडल्या. याबाबत त्यांना विचारले असता, वसतिगृहाच्या पाणी साठवणूक टाक्यांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला गेला होता. ते पाणी प्यायल्यानंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. याच गंभीर प्रश्नाकडे लक्ष वळविण्यासाठी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत कुलगुरूंच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात रिकाम्या पाण्याच्या बॉटल घेऊन 'कुलगुरू हमको पढणे दो, देश को आगे बढने दो', कुलगुरू मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रत्येक वसतिगृहासह विद्यापीठातील प्रत्येक विभागात आणि मुख्य ग्रंथालयात आरओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली. तसेच १७० विद्यार्थिनींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्या रुग्णालयाचा खर्च विद्यापीठ प्रशासनाने परत करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Intro:डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे सात वस्तीगृहातील सुमारे 170 विद्यार्थिनींना विषबाधा झाली संतप्त विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करीत प्रत्येक वस्तीगृह व लायब्ररीमध्ये आर ओ प्युरिफायर वॉटर प्लांट बसविण्याची मागणी केली आहे

Body:डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात एकूण सात मुलींचे वस्तीगृह आहे या वस्तीग्रह मध्ये परजिल्ह्यातून परगावातून शिक्षणासाठी आलेल्या शेकडो मुली राहतात दोन दिवसापासून या सातही वस्तीगृहातील विद्यार्थिनी आजारी पडत होत्या अशा एकूण 170 विद्यार्थिनी आजारी पडल्या याबाबत त्यांना विचारले असता वस्तीगृहा च्या पाणी साठवणूक टाक्यांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला गेला होता हाच पाणी विद्यार्थिनींनी प्यायल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले होते याच गंभीर प्रश्नाकडे लक्ष वळविण्यासाठी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत कुलगुरूंच्या कार्यालया खाली जोरदार घोषणाबाजी केली यावेळी हातात रिकाम्या पाण्याच्या बॉटल घेऊन कुलगुरू हमको पडणे दो देश को आगे बढने दो कुलगुरू मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या यावेळी प्रत्येक वस्तीगृहात प्रत्येक विभागात व मुख्यग्रंथालयात आर हो प्युरिफायर वॉटर प्लांट बसविण्यात यावे यासह 170 विद्यार्थिनींनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहे ती रक्कम विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने परत करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.