ETV Bharat / state

दहावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

सिल्लोड तालुक्यातील अंधारी शिवारात दहावीच्या  विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १० वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली.

student drown in farm lake
मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
author img

By

Published : Feb 26, 2020, 7:37 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील काटोन वस्ती शिवारातील शेततळ्यात आज दुपारी बाराच्या सुमारास दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी भागवत कारभारी दांगोडे (वय.१६) याचा बुडून मृत्यू झाला.

student drown in farm lake
मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंधारी येथील विद्यार्थी भागवत कारभारी दांगोडे हा दुपारी शाळेच्या सुट्टीनंतर काटोनवस्ती शिवारात गेला. या शिवारातील शेख फारुख यांच्या शेतातील शेततळ्यावर घोड्याला पाणी पाजण्यासाठी गेला असता पाय घसरल्यामुळे तो या शेततळ्यात बुडाला. थोड्या वेळानंतर वडील कारभारी दांगोडे हे अजून मुलगा का आला नाहीत हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना मुलगा शेततळ्यास बुडाल्याचे कळाले. त्यांनी आरडा ओरड करून परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. ही घटना वाऱयासारखी गावभर पसरल्याने गावातील श्याम सोनवणे,शाहरुख शेख कलीम,योगेश जाधव,ज्ञानेश्वर वाघ या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन शेततळ्यात उड्या मारून मोठे शर्तीचे प्रयत्न करून भागवतची शोधा शोध केली.परंतु शेततळ्यात जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे जवळपास तासभरानंतर भागवतला शेततळ्याच्या बाहेर काढण्यात यश आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

सदरील घडलेल्या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आली. घटनेचा पंचनामा सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दादाराव पवार यांनी केला. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. साडेपाचला बोधेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भागवत दांगोडे या विद्यार्थ्यांची चार मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होणार होती. परंतु नियतीच्या घाल्याने अखेर त्याचे दहावीची परीक्षा देण्याचे स्वप्न अपूर्णच राहून गेले. भागवत हा विद्यार्थी शाळेत व क्लासेसमध्ये अत्यंत हुशार असल्याची चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक ग्रामस्थ व परिसरात एकच शोकाकूल वातावरण पसरले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.