ETV Bharat / state

औरंगाबाद ग्रामीणमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन - औरंगाबाद ग्रामीण लॉकडाऊन

औरंगाबाद ग्रामीण भागात आज शंभर टक्के लॉकडाउन करण्यात आले आहे. सकाळपासून वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

aurangabad rural area  aurangabad latest news  औरंगाबाद ग्रामीण लॉकडाऊन  औरंगाबाद लेटेस्ट न्युज
औरंगाबाद ग्रामीणमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन
author img

By

Published : Apr 21, 2020, 3:45 PM IST

औरंगाबाद - शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस आयुक्तालय हद्दीत दुपारी दीड ते सकाळी सहापर्यंत कडकडीत बंद पाळला जात आहे. त्यात ग्रामीण भागात पोलीस अधीक्षकांनी एक दिवस शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिल्याने मंगळवार सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

औरंगाबाद ग्रामीणमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 32 वर पोहोचली असली तरी हे सर्व रुग्ण शहरी भागातील आहेत. सध्यातरी ग्रामीण भागात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी गावाची हद्द आधीच बंद केली आहे. कोणालाही गावात येण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने कोरोनाचा संसर्ग अद्याप गावापर्यंत पोहोचला नाही. मात्र, शहरातील अनेक लोक ग्रामीण भागात आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बाहेरून येणारी वर्दळ आणि गावात फिरणाऱ्या लोकांवर आवर घालण्यासाठी एक दिवसाचा बंद करण्यात आला आहे. या बंदला सकाळ पासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णालये आणि औषध दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारीचे उपाय केले जात असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.