ETV Bharat / state

औरंगाबादची लोकसभा जागा लढवण्यासाठी 'एमआयएम' इच्छुक - Lok Sabha seats

औरंगाबादमध्ये आमदार इमतियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि एमआयएमने स्वतः निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली.

औरंगाबाद2
author img

By

Published : Mar 6, 2019, 9:41 AM IST

औरंगाबाद - राज्यात बहुजन वंचित आघाडी निवडणूक लढवणार असून अनेक ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबादमधून माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारीला एमआयएमने अप्रत्यक्ष विरोध करत औरंगाबादेतून स्वतः लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

औरंगाबादमध्ये आमदार इमतियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि एमआयएमने स्वतः निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली.

औरंगाबाद
वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादला पहिली सभा घेत राज्यात नवीन समीकरणे जनतेसमोर ठेवली. राज्यात प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मान दिला, तर एमआयएम निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सन्मानपूर्वक जागा मिळणार नाहीत, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एमआयएम आता बहुजन वंचित आघाडी सोबत राज्यात निवडणूक लढवणार आहे. राज्यात किमान चार जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आमदार इमतियाज जलील यांनी सांगितले.त्यानुसार ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून या दोघांनी ठरवलेला निर्णय मान्य करू, मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता, औरंगाबादची जागा एमआयएमने लढवावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे प्रस्ताव पुढे पाठवला आहे. कार्यकर्त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा लढवावी, अशी मागणी केली. त्यामुळे एमआयएम अध्यक्ष ओवेसी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Intro:Body:

 aimim Interested Aurangabad contest the Lok Sabha seats

औरंगाबादची लोकसभा जागा लढवण्यासाठी 'एमआयएम' इच्छुक

औरंगाबाद - राज्यात बहुजन वंचित आघाडी निवडणूक लढवणार असून अनेक ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबादमधून माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारीला एमआयएमने अप्रत्यक्ष विरोध करत औरंगाबादेतून स्वतः लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

औरंगाबादमध्ये आमदार इमतियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि एमआयएमने स्वतः निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादला पहिली सभा घेत राज्यात नवीन समीकरणे जनतेसमोर ठेवली. राज्यात प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मान दिला, तर एमआयएम निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सन्मानपूर्वक जागा मिळणार नाहीत, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एमआयएम आता बहुजन वंचित आघाडी सोबत राज्यात निवडणूक लढवणार आहे. राज्यात किमान चार जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आमदार इमतियाज जलील यांनी सांगितले. 

त्यानुसार ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून या दोघांनी ठरवलेला निर्णय मान्य करू, मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता, औरंगाबादची जागा एमआयएमने लढवावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे प्रस्ताव पुढे पाठवला आहे. कार्यकर्त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा लढवावी, अशी मागणी केली. त्यामुळे एमआयएम अध्यक्ष ओवेसी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.