ETV Bharat / state

अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई सभेत गटविकास अधिकाऱ्यास बाटली फेकून मारली - block devlopment officer

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूडचे गटविकास अधिकारी सुभाष बोबटे यांना रागाच्या भरात पाण्याची बाटली फेकून मारली.

सभागृहात गोंधळ
author img

By

Published : May 28, 2019, 11:04 PM IST

अमरावती - पाणी टंचाईच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेत आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूडचे गटविकास अधिकारी सुभाष बोबटे यांना रागाच्या भरात पाण्याची बाटली फेकून मारल्याने सभेत प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह अधिकारी सभागृहातून निघून गेले.

drought
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदस्य देवेंद्र भुयार

देवेंद्र भुयार यांनी वरुड येथील पाणी प्रश्न उपस्थित केला. वरूड येथील पाणी टंचाई निवारणार्थ सभा घेतली नाही, असा आटोप देवेंद्र भुयार यांनी केला. या आरोपाचे खंडन करीत वरूडचे प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांनी बोलण्यास सुरुवात करताच देवेंद्र भुयार यांनी पाण्याच्या दोन बाटल्या सुभाष बोपटे यांना फेकून मारल्या. सुदैवाने एक बाटली हुकली आणि दुसरी बाटली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने अडविली.

या घटनेनंतर सभागृहात गोंधळ झाला. भाजपचे रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे यांनी देवेंद्र भुयार यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. यावेळी सभागृहात गोंधळ वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह सर्व अधिकारी सभागृहाबाहेर निघून गेले. या घटनेनंतर देवेंद्र भुयार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

या वादाआधी गुरुदेवनगर येथील पाणी समस्येवर गौरी देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. गौरी देशमुख यांनी पाण्याची घागर अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर ठेवली. यावेळी अध्यक्ष नितीन गोंडाणे आणि गौरी देशमुख यांच्यातही वाद झाला.

Intro: ( फोटो ई-मेल वर पाठवले)
पाणी टंचाईच्या मुद्द्यावर आज अमरावती जिल्हा परिषदेत आयोजित विशेष सभेत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूडचे गट विकास अधिकारी सुभाष बोबटे यांना संतापाच्या भारत चक्क पाण्याची बाटली मारून फेकल्याने सभेत प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेचा भाजप सदस्यांनी निषेध केला तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह अधिकाऱ्यांनी सभागृहातून वॉकआऊट केले.

Body:आज दुपारी सभेला सुरुवात होताच गुरुदेवनगर येथील पाणी समस्येवर गौरी देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. गौरी देशमुख यांनी घागर अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर ठेवली. यावेळी अध्यक्ष नितीन गोंडाणे आणि गौरी देशमुख यांच्यात वाद झाला.
हा वाद क्षमत नाही तोच देवेंद्र भुयार यांनी वरुड येथील पाणी प्रश्न उपस्थित केला.वरूड येथील पाणी टंचाई निवारणार्थ सभाच घेतली नाही असा आटोप देवेंद्र भुयार यांनी केला. या आरोपाचे खंडन करीत वरूडचे प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांनी बोलण्यास सुरुवात करताच देवेंद्र भुयार यांनी पाण्याच्या दोन बाटल्या सुभाष बोपटे यांना फेकून मारल्या.सुदैवाने एक बाटली हुकली आणि दुसरी बाटली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने अडविली. या घटनेनंतर भाजपचे रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे यांनी देवेंद्र भुयार यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. यावेळी सभागृहात गोंधळ वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सन्हाग्रहाबाहेर वॉकआऊट केले. या घटनेनंतर देवेंद्र भुयार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.