अमरावती - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात गोंधळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधात राजापेठ पोलीस स्टेशन येथे दिली तक्रार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केले होते वक्तव्य
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चपलीने मारण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द न वापरण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्याविरोधात गैर उद्गार काढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे.
' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अटक करा'
मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विराधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द काढणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात यांची उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देताना युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हा संघटक विनोद गुहे, उपाध्यक्ष पवन केशरवानी, अनिल मिश्रा सुरज मिश्रा, महेश मुलचंदानी, पवन हिंगणे, आकाश राजगुरे, पवन देशमुख, नितीन मस्के, अक्षय चौधरी, कृष्णा जाधव, आशिष मिश्रा आदि उपस्थित होते.
हेही वाचा - मी तुम्हाला पुरून उरलो, आता चांगल्या शब्दांत टीका करणार - नारायण राणे