ETV Bharat / state

कचरा वेचणाऱ्या हातात पेन देण्याचे 'मिरॅकल'; अमरावतीतील ध्येयवेड्या तरुणाच्या धडपडीची कहाणी - shool

गरज आहे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदतीसहीत इतर मदतही करावी असे आवाहन करण्यात येत आहे. असे करणे आवश्यक आहे. या चिमुकल्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि महत्वकांक्षेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. न जाणो उद्या याच वस्तीतून देशाचे नेतृत्व निर्माण होईल.

विद्यार्थ्यांसाठीची शाळा
author img

By

Published : Nov 20, 2019, 6:11 AM IST

Updated : Nov 21, 2019, 12:13 AM IST

अमरावती - ज्या हातात कचरा वेचण्यासाठीचे पोतडे होते, त्याच हातात आज वही पेन आहे. ज्या डोळ्यांसमोर काही दिवसांपूर्वी कचऱ्याचा ढीग होता, तेच डोळे आज काहीतरी होण्याचे स्वप्न पाहत आहेत. ही एखादी कहाणी नव्हे तर, अमरावतीतील नवसारी भागातल्या पारधी वस्तीवरील वस्तुस्थिती आहे. एका ध्येववेड्या तरुणाने येथील गरीब मुलांना शिकवण्याचा विडा उचलला आहे. त्यासंबंधीचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट

अमरावतीच्या नवसारी भागातील मिरॅकल फाऊंडेशनीच शाळा

अमरावतीतील नवसारी भागात ३०० घरांची पारधी समाजाची वस्ती आहे. आठराविश्वे दारिद्र्य या वस्तीत कायम वसतीला आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. जिथे रोज अंघोळ करणे हीच एक चैन आहे. तिथे शिक्षण म्हणजे चंद्रावर जाण्याइतकी अशक्यप्राय गोष्ट. या वस्तीतील लहानग्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचा संकल्प एका भगिरथाने केला. या आधुनिक भगिरथाचे नाव आहे पियुष वानखडे.

लहानग्यांच्या जीवनात 'मिरॅकल'

पियुष वानखडे हा एक उच्चशिक्षीत तरुण आहे. रोज सकाळी फिरण्यासाठी तो शहरातून नवसारी परिसरात येत असे. तेव्हा इथली लहान मुले त्याला भटकताना दिसायची. कचरा वेचणे, भीक मागून खाणे अशी कामे ही मुले करायची. या मुलांना बघून पियुषच्या मनात विचार आला, की या मुलांनाही शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळायला हवा. त्याच्या याच विचारातून मिरॅकल हार्ट फाऊंडेशन या संस्थेचा पाया रचला गेला.

उघड्यावरच भरते शाळा

मिरॅकल हार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून पियुषने जेव्हा दीड वर्षांपूर्वी इथे शाळा सुरू केली, तेव्हा त्या शाळेत फक्त पाच विद्यार्थी होते. पण, हळुहळु मुलांचा आणि त्याच्या पालकांचा विश्वास संपादन करण्यात त्याला यश आले. आणि आज या शाळेत जवळपास ७० विद्यार्थी शिक्षण घेतात. पण, या विद्यार्थ्यांसाठी आजही पक्क्या शाळेची सोय नाही. उघड्यावरच एक पत्र्याचे शेड टाकून ही शाळा भरते. या शाळेत हे विद्यार्थी मूळाक्षरे गिरवत आहेत.

जेवणाची भ्रांत तुर्तास मिटली

पियुष वानखडेची ही धडपड पाहून आणखी काही लोक त्याच्यासोबत जोडले गेले. काही जणांनी आर्थिक मदत देऊ केली. त्यातूनच या मुलांसाठी दररोजच्या आहाराची सोय करण्यात आली. आता येथे दररोज खिचडीचा आस्वाद विद्यार्थी घेत आहेत. या शाळेत येऊन मुले आकडेमोड शिकत आहेत. अक्षर ओळख करुन घेत आहेत. त्यासोबतच त्यांच्या खाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे त्यांना भीक मागत फिरण्याची गरज नाही. या कारणाने त्यांचे पालक सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत.

देणाऱ्या हातांची गरज

पियुष वानखडेचा हा प्रयत्न आज प्राथमिक स्थितीत आहे. ७० विद्यार्थी शिकणारी ही शाळा आज उघड्यावरच आहे. तिला एका पक्क्या इमारतीची गरज आहे. वस्तीवरुन शाळेपर्यंत येण्यासाठी एखादी स्कूल व्हॅन असावी, अशी इच्छाही विद्यार्थी बोलून दाखवत आहेत. आता गरज आहे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदतीसहीत इतर मदतही करावी असे आवाहन करण्यात येत आहे. असे करणे आवश्यक आहे. या चिमुकल्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि महत्वकांक्षेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. न जाणो उद्या याच वस्तीतून देशाचे नेतृत्व निर्माण होईल.

Intro:अंधारमय आयुष्य तेजोमय करण्यासाठी सुरू झाली अमरावतीत एक शाळा गरज आहे.आता गरज आहे आपल्या मदतीची
---------------------------------------------------------
स्पेशल स्टोरी करावी

अमरावती अँकर
आता पर्यत तुम्ही अनेक अंगनवाडी,इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघितल्या असेल.त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची प्रवेश फी भरताना अनेकांची दमछाक होते.आयुष्यभर ज्या समाजाच्या वाट्याला दरिद्री आणि भीक मागुन पोट भरायाची वेळ असेल त्या समाजातील मूल खरोखर इंग्रजी बोलू शकेल का??,ते  चांगलं शिक्षण घेऊ शकेल का?? असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपलं उत्तर हे नाही असणार. पण हे खरं आहे.भीक मागून ,भंगार वेचून पोटाची भूक शमवणारे चिमुकले मूल आज शिक्षनाच्या मुख्य प्रवाहात आले आहे.आणि हे सर्व शक्य झालं एका ध्येय वेड्या तरुणाच्या पुढाकाराने पाहूया एक स्पेशल रिपोर्ट..

Vo-1
अमरावतीच्या नवसारी भागातील टीनाचे छपर असलेले तुटकी फुटकी दहा बाय दहाची शाळा ,याच शाळेत अभ्यासाचे धडे गिरवणारे पारधी समाजातील हे मूल कधी काळी सूर्योदय झाला की कोवळ्या पाठीवर  पोत घेऊन भंगार वेचण्यासाठी जायचे, पोट भरण्यासाठी एक कटोरी दारोदार दारोदार घेऊन जाणाऱ्या या मुलांच्या हातात आज वही पेन येऊन ते जीवनाचे यशस्वी भविष्य ते  रेखाटतात ..

बाईट-1-विद्यार्थी

Vo-2
हे  सर्व शक्य झालं पीयूष वानखडे या उच्चशिक्षित ध्येय वेड्या तरुणामुळे ही प्रेरणादायी कहाणी आहे.अमरावतीच्या नवसारी परिसरातील पारधी लोकांची एक वस्ती आहे.रोज दोन घास मिळावे यासाठी भंगार वेचणाऱ्या 300 लोकांची ही वस्ती जिथे आंघोळीला पाणी नाही तिथे मिनमिनती पणती नाही.इथल्या मुलांना शिक्षणाचा तर गंधही नव्हता पण पीयूष वानखडे या ध्येयवेड्या तरुणाने या मुलाचं जीवन घडवण्याचा विळा उचलला त्यातूनच उभी राहली मिरॅकल हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हक्काचे घर..

बाईट-2-पीयूष वानखडे -संस्थापक मिरॅकल हार्ट फाउंडेशन-डोक्यात टोपी

300  लोकसंख्या असलेल्या या वस्तीत 60 ते 70 मूल राहतात. दीड वर्षांपूर्वी या शाळेची मुहूर्तवेळा रोवले तेव्हा पाच विद्यार्थी होते.दीड वर्षातच येथे आता 70 विध्यार्थी शिक्षण घेतात.यात प्रेरणादायी बदल म्हणजे कुणाला डॉक्टर व्हायच आहे.कुणाला पोलीस बनून सेवा करायची आहे.

बाईट-3-विद्यार्थी

Vo-4
शिक्षणाना बरोबरच या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना सामाजिक लोकांनी दिलेल्या अन्नदानातून त्यांना दररोज खिचडी दिली जाते .सोबतच अनेक सामाजिक कार्यकर्ते येथे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत असतात.

बाईट-4-खिचडी शिजवनारी पालक
बाईट-5-प्रदीप चौधरी सामाजिक कार्यकर्ते .चष्मा लावलेला

Vo-5
65 विद्यार्थ्याची असलेली ही शाळा उघड्यावरच भरते त्यामुळे ,अनेकदा पावसामुळे तर कधी उन्हामुळे या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.म्हणून आमच्या साठी पक्की शाळा व्हावी,एक स्कूल व्हॅन मिळावी अशी मागणी हे विद्यार्थी करतात.

बाईट-6-विद्यार्थी

अमरावतीच्या या ध्येयवेड्या तरुणाने सुरू केलेल्या शाळेतील चिमुकल्याची शिक्षणाची गाडी भविष्यात सुसाट वेगाने धावेल यात शंका नाही.पण आता ही शाळा उभारण्यासाठी,विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी,त्यांच्या पाटी पुस्तकासाठी गरज आहे.तुमच्या आमच्या मदतीच्या गरजेची....

स्वप्निल उमप
ETV भारत अमरावती....Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 21, 2019, 12:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.