अमरावती Amravati Suicide Case : आरोपी हा मृतकाच्या पत्नीला मोबाइलवर कॉल करीत होता. या कारणावरुन मृतक आणि आरोपी यांच्यात 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास भांडण झालं. त्यावेळी आरोपीने मृतकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली होती. त्यामुळं मृतक यांनी शेतात जाऊन स्वत:ला जाळून घेतलं. त्यांच्यावर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळं त्यांची पत्नी देखील रुग्णालयातच मुक्कामाला होती. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयात त्यांनी आत्महत्या केली होती.
गुन्हा दाखल : याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी (Gadge Nagar Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आपल्या मृत्यूपूर्व मृतक यांनी आरोपीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं आपल्याला ते अपमानजनक वाटलं, त्यामुळं आपण जाळून घेतल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं मृतकाचे मृत्यूपूर्व बयान व त्यांचे वडीलांच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आईचा आत्महत्येचा प्रयत्न : याआधीही अशीच एक घटना घडली होती. आपल्या दोन मुलांना दूधातून विष दिल्यानंतर आईने स्वत: देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक घटना गुरुवार, 11 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 28 वर्षीय महिलेसह तिची 11 वर्षीय मुलगी आणि 7 वर्षीय मुलगा यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर महिलेचा पती शेतमजुरीचे काम करतो. तो सकाळी शेतात कामावर निघून गेल्यानंतर महिलेने दोघांना दूधातून विषारी औषध प्यायला दिलं होतं. त्यानंतर तिघांनी हे विषारी द्रव्य प्राशन केलं. काही वेळाने मुलीला उलट्या सुरू झाल्या. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच तिनही मायलेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं.
हेही वाचा -