ETV Bharat / state

अमरावती शहरालगत बहरला पिवळा पळस

अमरावती शहरालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे मार्डी मार्गावर मार्च महिन्याच्या भर उन्हात नारंगी फुलांच्या शेकडो झाडांमध्ये तीन ठिकाणी पिवळ्या रंगाचा पळस डोळ्यात भरतो. मार्डी मार्गावरील तीन पैकी पिवळ्या रंगाच्या पळसाचे एक झाड रस्ता रुंदीकरणाच्या कामात दोन-चार दिवसांत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

author img

By

Published : Mar 12, 2019, 7:21 AM IST

पळस2

अमरावती - 'पळसाला पाने तीनच' ही म्हण सर्वश्रुत असल्याने पळस हे अस्सल भारतीय वृक्ष सर्वांनाच परिचयाचे. नारंगी रंगाची उधळण करणारा पळस सर्वत्र आढळत असताना, अमरावती शहरालगत बहरलेला पिवळ्या रंगाचा पळस लक्षवेधक ठरतो आहे. अतिशय दुर्मिळ असणारा पिवळा पळस अमरावती जिल्ह्यात आज केवळ ९ ठिकाणी अस्तित्व टिकवून आहे.

अमरावती शहरालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे मार्डी मार्गावर मार्च महिन्याच्या भर उन्हात नारंगी फुलांच्या शेकडो झाडांमध्ये तीन ठिकाणी पिवळ्या रंगाचा पळस डोळ्यात भरतो. मार्डी मार्गावरील तीन पैकी पिवळ्या रंगाच्या पळसाचे एक झाड रस्ता रुंदीकरणाच्या कामात दोन-चार दिवसांत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इतर दोन मात्र, मुख्य मार्गापासून काही अंतर आतमध्ये आहेत. या वृक्षांसह दोन वृक्ष पोहरा जंगलात आहेत तर मेळघाटात धुळघट येथे तीन आणि धरणी लागत दोन पिवळे पळस आहेत.

महाराष्ट्रात नारंगी आणि पिवळ्या पळसासोबत पांढऱ्या रंगाचा पळस बीड जिल्ह्यात आढळतो. काळ्या पळसाचाही उल्लेख शास्त्रात आहे. मात्र, काळा पळस महाराष्ट्रात अद्याप तरी कुठेही आढळला नसल्याची माहिती सेवानिवृत्त वनाधिकारी विजत भोसले यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.

पळसाच्या प्रत्येक फुलात १० पुंकेसर असून त्यांपैकी ९ हे जोडलेले व एक सुटा असतो. पळसाच्या फुलात पाच मकरद्रग्रंथी असतात. त्यातील मकरंद मिळवण्यासाठी विविध पक्षी, खरी, भुंगे हे धडपड करीत असतात. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात बहरलेल्या पळसावर पक्षांचे वास्तव्य अधिक दिसते.
पळसाची फुले, खोड, मुळे, पाने, बी हे सर्वच उपयुक्त आहेत. सध्या अमरावती शहरालगतचा परिसर पळसाने बहरला असून नारंगी फुलांनी लदबदलेला पळस हा वणज्योत असल्याचा भास होतो. इंग्रजांनी त्यास 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' असे नाव दिले. नारंगी पळस सर्वत्र आढळत असताना पिवळ्या पळसाचे सौंदर्य पाहणाऱ्यांना भारावणारे आहे.

Intro:'पळसाला पाने तीनच' ही म्हण सर्वश्रुत असल्याने पळस हे अस्सल भारतीय वृक्ष सर्वांनाच परिचयाचे. नारंगी रंगाची उधळण करणारा पळस सर्वत्र आढळत असताना अमरावती शहरालगत बाहेलेला पिवळ्या रंगाचा पळस लक्षवेधक ठरतो आहे. अतिशय दुर्मिळ असणारा पिवळा पळस अमरावती जिल्ह्यात आज केवळ ९ ठिकाणी अस्तित्व टिकवून आहे.

Body:अमरावती शहरालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे मार्डी मार्गावर मार्च महिन्याच्या भर उन्हात नारंगी फुलांच्या शेकडो झाडांमध्ये तीन ठिकाणी पिवळ्या रंगाचा पळस डोळ्यात भरतो. मार्डी मार्गावरील तीन पैकी पिवळ्या रंगाचा पळसाचे एक वृक्ष रस्ता रुंदीकरणाच्या कामात दोन चार दिवसात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इतर दोन मात्र मुख्य मार्गापासून काही अंतर आतमध्ये आहेत. या वृक्षांसाह दोन वृक्ष पोहरा जंगलात आहेत तर मेळघाटात धुळघट येथे तीन आणि धरणी लागत दोन पिवळे पळस आहेत. महाराष्ट्रात नारंगी आणि पिवळ्या पळसासोबत पांढऱ्या रंगाचा पळस बीड जिल्ह्यात आढळतो. काळ्या पाळसाचाही उल्लेख शास्त्रात आहे मात्र काळा पळस महाराष्ट्रात अद्याप तरी कुठेही आढळला नसल्याची माहिती सेवानिवृत्त वनाधिकारी विजत भोसले यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.
पळसयाच्या प्रत्येक फुलात १० पुंकेसर असून त्यांपैकी ९ हे जोडलेले व एक सुटा असतो. पळसाच्या फुलात पाच मकरद्रग्रंथी असतात.त्यातील मकरंद मिळवींतासाठी विविध पक्षी, खरी, भुंगे हे धडपड करीत असतात त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात बहरलेल्या पळसावर पक्षांचे वास्तव्या अधिक दिसते.
पळसाचे फ़ुलं, खोड, मुळॆ, पाने, बी हे सर्वच उपयुक्त आहेत. साध्य अमरावती शहरालगतचा परिसर पळसाने बहरला असून नारंगी फुलांनी लदबदलेला पळस हा वणज्योत असल्याचा भास होतो. ईंग्रजांनी त्यास 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' असे नाव दिले. नारंगी पळस सर्वत्र आढळत असताना पिवळ्या पळसाचे सौंदर्य पाहणाऱ्यांना भरावणारे आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.