अमरावती- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व कार्याध्यक्षा आमदार यशोमती ठाकूर आज तिवसा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या सर्वात आधी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेणार आहेत व त्यानंतर शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
आज सकाळी यशोमती ठाकूर यांनी घरी पूजा-अर्चा करून आपले वडील माजी आमदार दिवंगत भय्यासाहेब ठाकूर यांच्या फोटोचे दर्शन घेतले. त्यानंतर यशोमती ठाकूर यांच्या मातोश्रींनी त्यांना ओवाळणी घातली. नंतर यशोमती ठाकूर तिवसा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना झाल्या.
हेही वाचा- दर्यापूर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारी जाहीर होताच भाजपचे दोन गट आमने-सामने