ETV Bharat / state

काळाबाजार करणाऱ्यांनो खबरदार; यशोमती ठाकूर यांचा इशारा

आजच्या या संकट काळात आपले देशावर किती प्रेम आहे तसेच समाजाप्रती आपली बांधीलकी हे सिद्ध करण्याची वेळ आहे. अशा या संकट काळात जर कोण्या व्यापाऱ्याने काळाबाजार केल्याचे आढळले, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

yashomati thakur  guardian minister amravati  अमरावती पालकमंत्री  अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर
काळाबाजार करणाऱ्यांनो खबरदार; यशोमती ठाकूर यांचा इशारा
author img

By

Published : Mar 27, 2020, 7:31 AM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कठीण परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून आता काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

काळाबाजार करणाऱ्यांनो खबरदार; यशोमती ठाकूर यांचा इशारा
आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात यशोमती ठाकूर यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील उत्पादक, विक्रेते, वितरक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही नफा कमावण्याची वेळ नाही. आजच्या या संकट काळात आपले देशावर किती प्रेम आहे तसेच समाजाप्रती आपली बांधीलकी हे सिद्ध करण्याची वेळ आहे. अशा या संकट काळात जर कोण्या व्यापाऱ्याने काळाबाजार केल्याचे आढळले, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.