ETV Bharat / state

'योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात संविधान आणि लोकशाहीचा खून'

हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसानी सीमेवरच रोखून धरले. या वागणूकीचा वागणुकीचा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

author img

By

Published : Aug 20, 2020, 7:20 PM IST

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

अमरावती : उत्तरप्रदेश राज्यातील आझमगढ येथे एका दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवरच रोखून धरले. दरम्यान उर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तप्रदेश पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेश राज्यात संविधान आणि लोकशाहीचा खून झाला असल्याचंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, उत्तरप्रदेशमध्ये जे घडलं त्या सर्व गोष्टीचा मी निषेध करते. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीलाच आपण सर्वाधिक महत्त्व देतो. आज राजीव गांधींची जयंती आहे. त्यांनी पंचायत राज कायदा मोठया प्रमाणावर तयार केला. त्यांच्याच जयंतीदिनी भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज पंचायत कायदा असताना सुद्धा नितीत राऊत यांना थांबवण्यात आले. उत्तरप्रदेशमध्ये लोकशाहीचा खून होत आहे. जेव्हा-जेव्हा उत्तर प्रदेशमधील समस्या सोडवण्यासाठी प्रियंका गांधी जातात तेव्हा ही त्यांना त्रास दिला जातो. तेथील सरकार हे संविधानाचा आणि लोकशाहीचा खून करत असल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगडमधील बांसा गाव येथे दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी नितीन राऊत जात होते. याळेळी आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. राऊत यांना पोलिसांनी अडवल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.